ICC World Cup 2023 : BCCI संकटात! ICC ने वर्ल्डकपचे यजमानपद घेतले हिसकावून ?

बीसीसीआय मोठ्या अडचणीत
icc World Cup 2023 out of India
icc World Cup 2023 out of Indiasakal

ICC World Cup 2023 Out Of India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील वर्षी होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक बाबत संकटात आली आहे. भारत या स्पर्धेचे यजमान आहे. ज्यामध्ये इतर अनेक देशांचे संघ सहभागी होणार आहेत. बीसीसीआय एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढत असल्याचे कळते. इतकंच नाही तर प्रश्न सुटले नाहीत तर आयसीसी हा विश्वचषक भारताबाहेर हलवू शकते.

icc World Cup 2023 out of India
Virat Kohli : पुजाराच्या शतकावर विराटने '56 इंच की छाती' काढून केले सेलिब्रेशन; VIDEO व्हायरल

भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डांमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा निघू शकलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा हे सातत्याने आयसीसीवर बीसीसीआयबाबत उदासीन वृत्ती बाळगल्याचा आरोप करत आहेत. पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व स्पर्धेत भाग न घेण्याची पाकिस्तानने अनेकवेळा धमकी दिली होती, मात्र आता ही स्पर्धा भारतात होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

icc World Cup 2023 out of India
DRS Technical Glitch : DRS थकलं! यजमानांना आधी बेल्सने नंतर DRS ने दिला दगा, गिल थोडक्यात वाचला

पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये सुरू असलेल्या वादावर रझा यांनी अनेक विधाने केली आहेत आणि दोन्ही देशांमधील हे प्रकरण आयसीसीसमोर अनेकदा मांडले आहे. आशिया चषकात सहभागी होण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही ना, हे स्पष्ट झाले आहे. यावर संतापलेल्या पीसीबीला अद्याप अधिकृतपणे सांगता आलेले नाही की पाकिस्तान संघ एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नाही. सध्या आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय झाल्यानंतरच हे प्रकरण निकाली निघेल.

icc World Cup 2023 out of India
BAN vs IND : गिलचे पहिले तर पुजाराचे वेगवान कसोटी शतक; तिसऱ्या दिवशी भारताची सामन्यावर पकड

2016 मध्ये भारताने शेवटचे टी-20 विश्वचषक आयोजित केले होते. त्यानंतरही बीसीसीआय कर समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरले होते. आयसीसीने बीसीसीआयच्या वार्षिक हिस्सामधून 190 कोटी रुपये कापले. यावेळी आयसीसीने कर बिल 21.84 टक्के किंवा $116 दशलक्ष (रु. 900 कोटी) वाढवले ​​आहे. BCCI 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारत सरकारला कर सवलतीसाठी राजी करू शकले नाही, तर बोर्डाला 900 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com