नागपूर : नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ यंदा आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत असून सुवर्ण महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम येत्या २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो- खो स्पर्धा महाल येथील चिटणीस पार्क येथे होईल.
सुवर्ण महोत्सवाचा स्नेहमिलन हा मुख्य सोहळा रविवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळात महाल येथील डी.डी. नगर शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी दिवसभर विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मंडळाचे देश-विदेशात असलेले जवळ-जवळ ५०० आजी-माजी सदस्य येतील असा अंदाज आहे.
अजूनही माजी खेळाडू-सदस्यांशी संपर्क साधणे सुरू आहे. यासाठी ज्यांनी मंडळात खो-खो, ॲथलेटिक्सचा सराव केला आहे, अशा खेळाडू-सदस्यांनी सचिव प्रशांत जगताप (९४२३१०३५५३) आणि सुवर्ण महोत्सव समितीचे सहसचिव नरेश शेळके (९८५०२०९७२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.