US Open 2023  ESAKAL
क्रीडा

US Open 2023 : प्रचंड उकाडा अन् घामांच्या धारा... आव्हानात्मक सामन्यात जोकोविच, स्वियातेक यांचा सरळ सेटमध्ये विजय

अनिरुद्ध संकपाळ

US Open 2023 Novak Djokovic : युएस ओपन टेनिस 2023 स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये नोव्हाक जोकोविच आणि महिला एकेरीमध्ये इगा स्वियातेक यांनी सरळ सेटमध्ये विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान जोकोविच आणि स्वियातेक यांना प्रचंड उकाडा जाणवत होता.

दुसरे मानांकन असलेल्या नोव्हाक जोकोविचने रँकिंगमध्ये 76 व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या बर्नाबे जापाटा मिरालेस चा 6-4, 6-1, 6-1 अशा सर सेटमध्ये पराभव केला. तर अव्वल मानांकन असलेल्या पोलंडच्या स्वियातेकने ऑस्ट्रेलियाच्या डारिया साविलेचा 6-3, 6-4 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. स्वियातेक ही युएस ओपनची गतविजेती आहे.

तित्सिपासला पराभवचा धक्का

सातवे मानांकन प्राप्त स्टेफानोस तित्सिपासला मोठा धक्का बसला. त्याला स्वित्झर्लंडच्या डॉमिनिक स्टिकरने 7-5, 6-7, 6-7, 7-6, 6-3 अशी मात दिली. यापूर्वी अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफने रशियाच्या 16 वर्षाच्या मीरा आंद्रिवाचा 6-3, 6-2 असा पराभव केला. आता तिचा सामना बेल्जियमच्या 32 वे मानांकन असलेल्या एलिसे मर्टेंससोबत होणार आहे.

विनस विलियम्सचा पराभव

पुरूष एकेरीमध्ये रशियाच्या दानिल मेदवेदेवने एक तास 14 मिनिटे चाललेल्या सामन्यात एट्टिला बालाजचा 6-1, 6-1, 6-0 असा पराभव केला. तर महिला एकेरीमध्ये अमेरिकेची अनुभवी विनस विलियम्सला पराभवाचा धक्का बसला. तिला बेल्जियमच्या पात्रता फेरी खेळून आलेल्या ग्रीट मिनेनने 6-1, 6-1 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले. विनसचा युएस ओपन ग्रँडस्लॅमधील 100 वा साना होता. त्यात तिचा सहज पराभव झाला. तिने 2000 आणि 2001 मध्ये युएस ओपन जिंकली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT