औरंगाबाद : इंदूर ( मध्य प्रदेश) येथे शुक्रवारी पार पडलेल्या १६ वर्षांखालील एआयटीए राष्ट्रीय लाॅन टेनिस स्पर्धेत औरंगाबादचा प्रणव कोरडे विजेता ठरला आहे. तसेच त्याने दुहेरीतही उपविजेतेपद मिळविले आहे. प्रणवने १६ वर्षांखालील वयोगटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा सर्वेश झंवर याचा ६-२,६-३ असा पराभव करित विजय मिळविला आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सने कोर्टवर वागताना मर्यादा ओलांडली. पुरुष खेळाडूंना कसेही वागले तरी चालते म्हणून महिलांनाही मोकळीक मिळावी, अशी तिची भूमिका चांगली नाही, असे परखड प्रतिपादन एक काळ गाजविलेल्या मार्टिना नवरातिलोवा यांनी केले.
न्यूयॉर्क : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. निर्णायक लढतीत त्याने अर्जेंटिनाचा आव्हानवीर जुआन मार्टिन डेल पोट्रो याच्यावर तीन सेटमध्ये मात केली. त्याचे हे कारकिर्दीतील 14वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असून याबरोबरच त्याने अमेरिकेचे महान टे
न्यूयॉर्क : गतविजेत्या रॅफेल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पिछाडीवरून विजय मिळविला. रशियाच्या कॅरेन खाचानोव याचे आव्हान त्याने 5-7, 7-5, 7-6 (9-7), 7-6 (7-3) असे परतावून लावले. ताकदवान खेळ करणाऱ्या खाचनोवने पहिला सेट जिंकून पकड घेतली होती; पण 32 वर्षीय नदालने 5-7, 7-5,
जकार्ता : भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीने आशियाई स्पर्धेत टेनिस दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले. कझाकिस्तानच्या अॅलेक्सझॅंडर बुबलिक आणि डेनिस येव्हसेयेव या जोडीवर त्यांनी 6-3,6-4 सहज विजय मिळवला. भारताचे हे आजच्या दिवसातील दुसरे सुवर्ण पदक आहे.
मॅसन, ओहायो - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या ॲड्रीयन मॅन्नारीनो याचे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर ४-६, ६-२, ६-१ असे परतवून लावले. जोकोविचला दहावे मानांकन आहे.
नाशिक : येथील नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन अजिंक्यपद टेबल टेनीस स्पर्धा बुधवार (ता. 8) पासून रविवार (ता. 12) दरम्यान नाशिक जिमखाना येथील क्रीडा संकुलात होणार आहेत. ही माहिती संघटनेचे व संयोजन समितीचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी यांनी पत्
नानजिंग (चीन) / मुंबई : साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मोहीम जोशात सुरू करताना झटपट विजय मिळविला. साईनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांच्या विजयामुळे सर्वच एकेरीच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीत विजय मिळविला.
वॉशिंग्टन : ब्रिटनच्या अँडी मरे याने 'एटीपी वॉशिंग्टन ओपन' टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. त्याने जागतिक क्रमवारीत 80व्या स्थानावर असलेल्या मॅकेन्झी मॅक्डोनाल्डला 3-6, 6-4, 7-5 असे हरविले.
हैदराबाद - भारताची दुहेरीतील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा लवकर "ममा' बनणार आहे. तिने टोकियोला 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने पुनरागमन करून "सुपरमॉम' बनण्याचे तिचे लक्ष्य आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 31 वर्षीय सानिया म्हणाली, की पुनरागमन
पुणे - अखिल भारतीय टेनिस संघटना व आसाम टेनिस संघटनेच्या वतीने गुवाहाटी येथे झालेल्या सुपर सीरिज टेनिस स्पर्धेत बारा वर्षांखालील गटात पुण्याच्या ईरा शहाने विजेतेपद मिळविले.
मुंबई : ली चोंग वेई हा जागतिक बॅडमिंटन तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेत्या ली चोंग वेईच्या संभाव्य अनुपस्थितीचा जागतिक स्पर्धेत श्रीकांतला फायदा होईल.
लंडन - विंबल्डन विजेतेपदासह सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने जागतिक क्रमवारीत पुन्हा टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. जोकोविच याआधी 11व्या क्रमांकावर होता. आठ महिन्यांच्या खंडांनंतर त्याने पुन्हा टॉप टेनमध्ये स्थान मिळविले. अंतिम फेरी गाठलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने तीन क्रमांक प्र
लंडन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाची मोहीम यशस्वी केली. विंबल्डनमध्ये मॅरेथॉन लढा दिलेल्या केव्हिन अँडरसनला हरवून त्याने पुरुष एकेरीचे विजेतेपद संपादन केले.
बँकॉक (थायलंड) - थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूचा पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा 21-15, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला.
लंडन : अमेरिकेची मातब्बर टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला मातृत्वानंतर ग्रॅंड स्लॅम विजेतेपद संपादन करण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अशा यशाची सर्वोत्तम संधी असलेल्या विंबल्डनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिला जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने हरविले.
लंडनमधील विंबल्डन नामक उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर शुक्रवारी सेमी फायनल मॅच सुरु होणार होती. समकालीन टेनिसमधील रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे या बिग फोरमधील मरेने स्पर्धेच्या पूर्वसंध्येस माघार घेतली होती. या मॅचमधील एका सहभागी स्पर्धकाने आदल्यादिवशी ग
इंग्लंड : विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी (13 जुलै) क्रिडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटेल एवढे अतितटीचे सामने बघायला मिळाले. केविन अॅंडरसन आणि जॉन इस्नर यांच्या तब्बल सहा तास चालेल्या सामन्याचा प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला. त्यानंतर नोव्हाक जोकोविच आणि रॅफेल नदाल या दोन दिग्गजांमध्ये हो
लंडन : विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी (13 जुलै) झालेल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या केविन अॅंडरसन याने अमेरिकेच्या जॉन इस्नर याला 6 तास 36 मिनिटात झुंजवत दमदार विजय मिळवला. याविजयासह त्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली.
लंडन : अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आपले ग्रॅंड स्लॅम पुनरागमन विंबल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश करून साजरे केले. विजेतेपदासाठी तिची गाठ आता जर्मनीच्या एंजेलिक केर्बरशी पडेल.
सेरेना आणि केर्बर यांचे विजय सहज झाले. दोघींनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व राखले. सेरेनाने आठव्या वि
विंबल्डन : दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने विंबल्डन टेनिस स्पर्धेत बुधवारी सर्वांत सनसनाटी निर्णयाची नोंद करताना रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आणले. त्याने मॅरेथॉन लढतीत फेडररचा 2-6, 6-7(5-7), 7-5, 6-4, 13-11 असा पराभव केला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.