Misbah Ul Haq prediction on World Cup  esakal
क्रीडा

ODI World Cup 2023 Prediction : तुम्ही कितीही म्हटलं तरी... मिसबाहची भविष्यवाणी, 'या' दोन संघातच होणार फायनल

अनिरुद्ध संकपाळ

Misbah Ul Haq prediction on World Cup : भारतात होणारा वनडे वर्ल्डकप 2023 अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार हा वर्ल्डकप ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. दरम्यान वर्ल्डकपमध्ये कोण दोन संघात फायनल होईल याबाबत भविष्यवाणी केली जात आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह - उल - हक याने देखील एक भविष्यवाणी केली आहे.

मिसाबाह न्यूज 24 स्पोर्ट्सशी बोलत होता. त्यावेळी त्याला वर्ल्डकप बाबत आपले मत विचारण्यात आले. कोणता संघ यावेळी वर्ल्डकप जिंकू शकतो असे विचारले असता त्याने, 'भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातच अंतिम सामना व्हावा असे वाटणार. माझं देखील हेच म्हणणं आहे. भारत आणि पाकिस्तान सामना हा सर्वात मोठ्या सामन्यापैकी एक आहे. यामुळे मला वाटते की भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल व्हावी.'

मिसबाह पुढे म्हणाला की, 'तुम्ही कितीही म्हटलं तरी जो संघ चांगला खेळेल तोच संघ फायनलमध्ये पोहचणार आहे. यासाठी लोक 4 वर्षे वर्ल्डकपची वाट पाहत असतात. वर्ल्डकपसाठीच संघ चार वर्ष मेहनत घेत असतात. त्यामुळे जो संघ चांगला खेळेल तोच संघ फायनलमध्ये पोहचेल.'

भारताने नुकतेच आयसीसी WTC Final खेळली. मात्र सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचून देखील त्यांच्या पदरी पराभवच पडला. भारताला गेली 10 वर्षे एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. आता भारतीय चाहत्यांना मायदेशात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान हे 15 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे एकमेकांना भिडणार आहेत. वर्ल्डकप 2023 चे संपूर्ण शेड्युल हे काही दिवसातच जाहीर करण्यात येईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT