TPL T20 : ऐकावं ते नवलंच! टाकला 1 चेंडू दिल्या 18 धावा, ठरला सर्वात महागडा चेंडू टाकणारा गोलंदाज

TPL T20 Abhishek Tanwar
TPL T20 Abhishek Tanwaresakal

TPL T20 Abhishek Tanwar : क्रिकेट जगतात कधी काय होईल हे सांगता यायचं नाही. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं आहे. कधी एका षटकात सहा षटकार लागतात तर एका षटकात चार - पाच विकेट्स जातात अन् सामन्याचं चित्र क्षणार्धात पालटतं. नुकतेच आपण रिंकू सिंहच्या शेवटच्या षटकातील 5 षटकार पाहिले. गोलंदाजासाठी ते एक वाईट स्वप्नच ठरते. तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये देखील असाच एक चेंडू ऐतिहासिक ठरला.

सलेम स्पार्टन्सकडून खेळणाऱ्या अभिषेक तंवरने मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात ऐतिहासिक चेंडू टाकला. हा चेंडू इतिहासातील सर्वात महागडा चेंडू ठरला. त्याने एका चेंडूवर तब्बल 18 धावा दिल्या. ही आश्चर्याची गोष्ट आहे मात्र असं खरोखर घडलं आहे.

TPL T20 Abhishek Tanwar
Wrestler Protest : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची तारीख ठरली; बृजभूषण यांचा मुलगा अन् जावई भरणार अर्ज?

सलेम स्पार्टन्सविरूद्धच्या सामन्यात चेपॉक सुपर गिलीज संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 20 षटकात पाच विकेट्स गमावून 217 धावा ठोकल्या. या डावाच्या शेवटच्या षटकात अभिषेक तंवरने 26 धावा दिल्या. अभिषेकने षटकाच्या 5 व्या चेंडूवर संज्य यादवचा त्रिफळा उडवला. संपूर्ण संघ आनंदाने नाचू लागला. मात्र पंचांनी नो बॉल देत त्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकला.

TPL T20 Abhishek Tanwar
Sanju Samson : इमानदारी! तीन फ्रेंचायजी संजूला कर्णधार करणार होत्या, मात्र पठ्ठ्याने दिलं असं उत्तर की...

यानंतर मिळालेल्या फ्री हिटवर यादवने षटकार मारला. तोही चेंडू नो बॉल ठरला. यानंतर पुढच्या चेंडूवर संजयने दोन धावा पळून काढल्या. मात्र अभिषेकने हा चेंडू देखील नो बॉल टाकला. अभिषेकने आपले षटक पूर्ण करण्यापूर्वीच 11 धावा झाल्या होत्या. नो बॉल टाकून संघाला बेजार करणाऱ्या अभिषेकने आता वाईड बॉल टाकला.

त्यामुळे आता एका चेंडू पूर्ण होण्यापूर्वीच 12 धावा धावा झाल्या होत्या. अखेर अभिषेकने वैध चेंडू टाकला मात्र त्यावर संजयने षटकार मारला. अभिषेकने एका चेंडूवर तब्बल 18 धावा दिल्या. हा क्रिकेट जगतातील सर्वात महागडा चेंडू ठरण्याची शक्यता आहे. याची अधिकृत कोणताही खातरजमा करण्यात आलेली नाही.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com