sports sakal
क्रीडा

Olympic : जिंकलो नसलो तरी पुन्हा जिंकण्यासाठीच खेळणार

भीमसेन धोंडे यांची अविनाशला आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा

आष्टी : जीवनात खेळ महत्वाचा आहे. आष्टी तालुक्यात भीमसेन धोंडे यांच्यामुळे शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. गोरगरीब नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय केली आहे. कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचा मी बहिस्त विद्यार्थी असून आज बीड जिल्ह्यातील हा माझा पहिला सत्कार असल्याने सांगत टोकियो येथे झालेल्या स्पर्धेत 'पदक जिंकलो नसलो तरी पुन्हा जिंकण्यासाठीच खेळणार' असल्याची ग्वाही अविनाशने शनिवारी (ता.२८) कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार भीमसेन धोंडे हे होते. पुढे बोलताना अविनाश याने सांगितले की, जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या परंतु जिवनामध्ये मी कधीच हार पत्करली नाही. अपयश हे जीवनात अनेक गोष्टी शिकवत असते, अपयश आले म्हणून जीवनात कधीच खचायचे नाही असे सांगत जीवनात यश अपयश येतच असतात असे सांगितले.

यावेळी माजी आमदार भीमसेन धोंडे म्हणाले की, तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळे हा जवान टोकियो ऑलिंपिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.ऑलिंपिकमध्ये पदक हुकले परंतु आॕलिम्पिक खेळाडु अविनाश साबळे याने आष्टीचा देशात नावलौकिक केला असल्याचे प्रतिपादन माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केले. कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र विभागातील विद्यार्थी आॕलिम्पिक खेळाडु अविनाश साबळे यांचा महाविद्यालयाच्या वतीने शनिवारी (ता.२८) कडा (ता.आष्टी) येथे आयोजीत सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.

यावेळी संस्थेच्या वतीने अविनाश साबळे या खेळाडूला २५ हजाराची मदत दिली. यावेळी सत्कारमुर्ती अविनाश साबळे, अविनाशचे वडील मुकुंद साबळे, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्रा.डॉ.सय्यद जमीर आदी उपस्थित उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बापु खैरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.मुस्ताक पानसरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT