esakal | बॉयकॉट यांच्या खेळात तरी कुठे ताकद होती; ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूचा सवाल...
sakal

बोलून बातमी शोधा

george and lisa

महिला क्रिकेटमधील ताकद आणि वेग पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत कुठेच नसते, या जेफ्री बॉयकॉट यांच्या टीप्पणीचा ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने चांगलाच समाचार घेतला.

बॉयकॉट यांच्या खेळात तरी कुठे ताकद होती; ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूचा सवाल...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सिडनी ः महिला क्रिकेटमधील ताकद आणि वेग पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत कुठेच नसते, या जेफ्री बॉयकॉट यांच्या टीप्पणीचा ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने चांगलाच समाचार घेतला. मला तर कधीही बॉयकॉट यांच्या खेळात कधीही ताकद दिसली नाही, अशा शब्दात स्थळेकरने सुनावले. 

वाचा ः निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोठा दिलासा; पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश...

बॉयकॉट यांनी बीबीसीसाठी कसोटी क्रिकेटचे समालोचन न करण्याचे ठरवले आहे. त्यानंतर लंडनच्या टेलीग्राफमध्ये स्तभ लिहिला आहे. विश्लेषक तज्ज्ञाची टिप्पणी करण्यापूर्वी कसोटी क्रिकेटचे कष्ट अनुभवण्याची गरज असते. त्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते याचाही अनुभव हवा. कसोटीत यशस्वी होण्यासाठी दडपणास सामोरे जाण्याची तयारी हवी, भावनांवर नियंत्रण हवे तसेच तंत्रही. हे काही पुस्तक वाचून किंवा क्लब क्रिकेट किंवा दुय्यम श्रेणीचे क्रिकेट खेळून येत नाही. हेच महिला क्रिकेटबद्दलही म्हणता येईल. महिला क्रिकेटबाबत बोलायचे तर त्यांची पुरुषांच्या क्रिकेटमधील ताकद आणि वेगाशी तुलनाही होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. 

वाचा ः भीषण ! 'त्या' रुग्णालयात 90 मिनिटांत सात जणांचा मृत्यू, कारण ऐकाल तर धक्का बसेल...

आता समालोचक झालेल्या स्थळेकर यांनी बॉयकॉट यांच्या टिप्पणीचा समाचार घेतला. एखाद्या परिस्थितीतून गेल्यावर टिप्पणी करणे कधीही चांगले असते. खेळाडूंचाही हाच विचार असतो, पण खेळताना होत असलेला विचार जसा पुरुषांच्या क्रिकेटमध्ये असतो तसाच महिला क्रिकेटमध्येही असतो, असे स्थळेकर यांनी सुनावले. क्रिकेटबाबत टीप्पणी करताना ताकद किती याचा संबंधच येत नाही. महिला क्रिकेट कसे कुल आणि सेक्सी आहे, असेच सांगितले जात असते. पण पुरुषांच्या आणि महिला क्रिकेटची तुलना आम्हाला करायला कोणी सांगू नये, दोन्ही पूर्ण भिन्न आहे. आता बॉयकॉट यांच्याच शब्दात बोलायचे झाले तर महिला क्रिकेटबाबत पुरुष क्रिकेटपटूंनीही काही बोलू नये, कारण ते कधीही महिला क्रिकेटपटूंविरुद्ध खेळलेले नाहीत. पण ते काही आम्ही कोणी बोलत नाही, असेही त्यांनी सुनावले.

वाचा ः सीआयएसएफ जवानांसोबतच दुजाभाव; 'स्वप्नपूर्ती'तील घरे खाली करण्यासाठी दबाव...

बॉयकॉट हे क्रिकेटचा कित्येक वर्ष भाग आहेत आणि ते त्याविरुद्धच बोलत आहेत. त्यांनी आता खेळाचा निरोप घ्यायला हवा. त्यांनी त्यांच्या काळातील ग्रेट खेळाडू होते. पण ताकदीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांच्या खेळात मला काही ताकद दिसली नाही. त्यांचा स्ट्राईक रेट बघा, आणि त्यांच्या काळातील महिला क्रिकेटपटूंचा कसोटीतील स्ट्राईक रेट बघा. बॉयकॉट यांच्यापेक्षा काही महिला क्रिकेटपटूंचा स्ट्राईक रेट नक्कीच चांगला होता, याकडे स्थळेकर यांनी आवर्जून लक्ष वेधले.