England-Joe-Root 
क्रीडा

IND vs ENG: "होय, मी चुकलो"; पराभवानंतर रूटची प्रामाणिक कबुली

विराज भागवत

नक्की कुठे चूक झाली, याबद्दलही जो रूटने सांगितलं

Ind vs Eng 2nd Test: भारतीय गोलंदाजांनी लॉर्ड्सच्या मैदानावर अप्रतिम मारा करत संघाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. पाचव्या दिवशी आधी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकवण्यास भाग पाडले. २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांत आटोपला. इंग्लंडच्या पराभवानंतर कर्णधार जो रूट याने आपण चुकल्याची प्रामाणिक कबुली दिली.

"कर्णधार म्हणून माझ्या खांद्यावर खूप जबाबदाऱ्या आल्या. मी भारताच्या दुसऱ्या डावात थोडा वेगळा प्लॅन आखायला हवा होता. शमी आणि बुमराह यांच्यात झालेली भागीदारी हा सामन्याचा खूप मोठा क्षण होता, यात दुमत नाही. मी त्यांच्या तळाच्या फलंदाजांबद्दल आखलेल्या योजना फोल ठरल्या. आणि त्यामुळेच इंग्लंडवरचा दबाव वाढला. आम्ही भारताचा डाव झटपट संपुष्टात आणू शकलो नाही. तळाच्या फलंदाजांना आम्ही कमी लेखलं आणि तीच माझी चूक झाली", अशी प्रामाणिक कबुली जो रूटने सामन्यानंतर दिली.

"बुमराह आणि शमी यांच्या फलंदाजीच्या वेळी आमच्या गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा चालू ठेवला. त्याजागी स्टंपात गोलंदाजी करायला हवी होती. एखाद दुसरा बाऊन्सर अचानक आला असता तर तेदेखील गोंधळून गेले असते. पण आम्ही जी गोलंदाजी केली ती अगदीच साधी होती. त्याचसोबत बुमराह आणि शमी यांनाही श्रेय द्यायला हवं. त्यांनी विचित्र फटकेबाजी करत धावा करणं सुरूच ठेवलं. त्यामुळे नक्की फिल्डर्स कुठे ठेवावेत हे कळणं अवघड जात होतं. अशा वेळी गडी बाद करण्यापेक्षाही धावा जाऊ नयेत याकडे आमचा कल होता. पण सगळे प्लॅन फसले", असेही रूटने कबूल केले.

असा रंगला सामना

पहिल्या डावात इंग्लंडने भारतावर २७ धावांनी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताकडून पुजारा-रहाणे आणि शमी-बुमराह जोडीने दमदार भागीदारी केल्या. त्यामुळे इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान देण्यात आले. पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने क्रिकेटच्या पंढरीत विजयी जल्लोष साजरा केला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील १५१ धावांच्या विजयासह संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. सिराजने ४, बुमराहने ३, इशांतने २ आणि शमीने एक बळी टिपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! उद्या होणाऱ्या टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : ठाण्यात पेपर फुटल्याने उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षा रद्द

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

SCROLL FOR NEXT