"जो मूर्ख असतो, त्याला..."; माजी क्रिकेटपटू इंग्लंडवर संतापला

England-Team
England-Team

Ind vs Eng 2nd Test: भारताने यजमानांना लॉर्ड्सच्या मैदानावर केलं पराभूत

Ind vs Eng 2nd Test: भारतीय गोलंदाजांनी लॉर्ड्सच्या मैदानावर अप्रतिम मारा करत संघाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. पाचव्या दिवशी आधी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकवण्यास भाग पाडले. २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांत आटोपला. इंग्लंडच्या या पराभवानंतर त्यांच्यावर माजी क्रिकेटपटू जेफरी बॉयकॉट यांनी सडकून टीका केली.

England-Team
IND vs ENG: अरेरे... इतिहासात इंग्लंडवर प्रथमच आली अशी वेळ!

"भारताने इंग्लंडवर मिळवलेल्या विजयामुळे दोन गोष्टी सिद्ध झाल्या. पहिली म्हणजे जो मूर्ख असतो त्याला जिंकण्याचा अधिकारच नसतो. कारण जर तुम्ही मूर्ख असाल तर तुम्हाला क्रिकेट सामना जिंकता येणारच नाही. जो रूटच्या दमदार फलंदाजीवर चाहते जिकते खुश असतात तितकेच ते त्याच्या भारताविरूद्धच्या नेतृत्वशैलीवर नाराज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, इंग्लंड सर्व धावांसाठी केवळ जो रूटवर अवलंबून राहू शकत नाही. वरच्या फळीतील तीन फलंदाजांनी लवकरच आपल्या खेळात सुधारणा केली पाहिजे. कारण आता त्यांची फलंदाजी म्हणजे एक विनोद ठरत चालला आहे", अशा शब्दात द टेलिग्राफमधून बॉयकॉट यांनी आपलं मत व्यक्त केलं.

England-Team
Video: विराट, इशांत अन् DRS... पाहा मैदानावर नक्की काय घडलं

"जो रूटने आतापर्यंत संघाचे चांगल्या पद्धतीने नेतृत्व केले आहे. पण बुमराह आल्यावर त्याने मार्क वूडला आखूड टप्प्याचे बाऊन्सर टाकायला सांगितले. बुमराहने जे अँडरसनसोबत केलं ते बुमराहसोबत केलं जावं असं इंग्लंडच्या गोलंदाजांना वाटत असणार यात काहीच चूक नाही. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी बुमराह-शमी जोडीशी वाद घालण्यात वेळ घालवला आणि त्यांना बाद करण्याऐवजी बाऊन्सरचा मारा करत राहिले. त्यामुळे सामन्याचा निकाल बदलण्यास मदत झाली", असेही बॉयकॉट यांनी नमूद केले.

England-Team
IND vs ENG : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियानं फडकावली विजयी पताका!

असा रंगला सामना

पहिल्या डावात इंग्लंडने भारतावर २७ धावांनी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताकडून पुजारा-रहाणे आणि शमी-बुमराह जोडीने दमदार भागीदारी केल्या. त्यामुळे इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान देण्यात आले. पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने क्रिकेटच्या पंढरीत विजयी जल्लोष साजरा केला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील १५१ धावांच्या विजयासह संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. सिराजने ४, बुमराहने ३, इशांतने २ आणि शमीने एक बळी टिपला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com