World Cup 2023 sakal
क्रीडा

World Cup 2023 : पाकिस्तान नाही तर कोणता संघ खेळणार वर्ल्ड कप? ICC चा Plan-B तयार

Kiran Mahanavar

ICC World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होऊनही 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानच्या सहभागाबाबत अनिश्चितता कायम आहे. विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून जर पाकिस्तानने या मेगा टूर्नामेंट मध्ये खेळला नाही तर आयसीसीकडेही यासाठी प्लॅन बी तयार आहे.

2023 च्या क्रिकेट विश्वचषकाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या स्पर्धेत 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन आणि अंतिम सामन्यांसह 48 सामने खेळले जातील.

2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानचा सहभाग संशयाच्या भोवऱ्यात आहे, पाकिस्तान सरकारने यांना भारतात खेळण्यासाठी अद्याप परवागी दिलेली नाही. जर पाकिस्तानने भाग घेतला नाही तर त्यांच्या जागी क्वालिफायरमधील तिसऱ्या क्रमांकाचा संघ खेळेल.

ग्रुप स्टेजमधील दोन सामने गमावल्यामुळे वेस्ट इंडिजवर वर्ल्डकपसाठी पात्रता न मिळण्याचा धोका आहे. श्रीलंका, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, नेदरलँड आणि ओमान हे संघ सुपर सिक्ससाठी पात्र ठरले आहेत.

आशिया चषक आणि विश्वचषकाचे यजमानपद जाहीर झाले आहे. भारताने पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला, परिणामी ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेतील सामन्यांसह हाइब्रिड मॉडल अंतर्गत आयोजित करण्यात आली.

भारताने शेवटचा पाकिस्तानचा दौरा 2008 मध्ये केला होता, तर पाकिस्तानने शेवटचा T20 वर्ल्ड कपसाठी 2016 मध्ये भारताचा दौरा केला होता. पाकिस्तान विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकानुसार पाच ठिकाणी अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद खेळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT