Prithvi Shaw Sapna Gill : सपना गिलचे पृथ्वी शॉवर विनभंगाचे आरोप, CCTV फुटेजचा Video झाला लीक

भांडणाच्या 4 महिन्यांनंतर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
Prithvi Shaw Sapna Gill Case Latest CCTV Footage
Prithvi Shaw Sapna Gill Case Latest CCTV Footage

Prithvi Shaw Sapna Gill Case Latest CCTV Footage : क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि यूट्यूब स्टार सपना गिल यांच्यातील भांडणाच्या 4 महिन्यांनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यातून हाणामारी कशी सुरू झाली हे दिसत आहे. सपना गिल सोफ्यावर बसून फोन वापरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

शोभित भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्यासाठी आला. दरम्यान त्यांच्यात परिस्थिती इतकी बिघडते की दोघांमध्ये हाणामारी झाली. काही वेळाने सपना जेव्हा हे भांडण पाहते तेव्हा ती तिच्या मित्राला वाचवण्यासाठी मध्ये येते. यानंतर परत क्लबच्या बाहेर भांडण झाली मग मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Prithvi Shaw Sapna Gill Case Latest CCTV Footage
Hardik Pandya Kapil Dev : हार्दिक पांड्याबाबत कायमच भिती वाटते... कपिल देव यांनी व्यक्त केली मोठी चिंता

मुंबई पोलिसांनी न्यायालयात म्हटले आहे की, सपना गिलचे आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांना कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. दुसरीकडे सपना गिलच्या कायदेशीर टीमकडून असे बोलले जात आहे की, पृथ्वी शॉ सतत चुकीचे शब्द वापरत असताना सपना गिल तिला रोखण्याचा प्रयत्न करत होती.

सपना गिलने पृथ्वी शॉवर मारहाण आणि विनयभंगाचा आरोप केला होता. एफआयआरनंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. या महिन्याच्या 26 तारखेला पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांना सपनाच्या आरोपांविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com