AFG Vs PAK Twitter
क्रीडा

AFG Vs PAK : मनात नसताना अफगाणिस्तानवर आली पाकमध्ये खेळण्याची वेळ!

अफगानिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर तेथील परिस्थितीती चिंताजनक झाली आहे.

सुशांत जाधव

AFG Vs PAK : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिका आता श्रीलंकेऐवजी पाकिस्तानात खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन करण्याची वेळ आलीये. त्यामुळे श्रीलंकेत नियोजित वनडे मालिका पाकिस्तानात खेळण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिका आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग असेल. अफगानिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर तेथील परिस्थितीती चिंताजनक झाली आहे.

देशातील संकटजन्य परिस्थितीचा क्रिकेटमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वास अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केलाय. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसह टी-20 वर्ल्डकपची योग्य ती तयारी सुरु असल्याचे बोर्डाने म्हटले होते. दरम्यान पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेत नियोजित वनडेसाठी टीम सिलेक्शन आणि राष्ट्रीय कॅम्प संदर्भातील निर्णय लांबणीवर टाकला होता. जोपर्यंत अफगाणिस्तान संघातील खेळाडू काबूल सोडून कोलंबोला रवाना होत नाहीत तोपर्यंत निर्णय घेणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले होते. मात्र आता मालिकाच आपल्या पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे.

'ईएसपीएन क्रिकइंन्फो'च्या वृत्तानुसार, अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी यांनी श्रीलंकेत घेण्यात येणारी वनडे मालिका पाकिस्तानमध्ये होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर काबूलहून सर्व उड्डाणे पूर्णत: बंद आहेत. दुसरीकडे श्रीलंकेंत कोरोनाची पुन्हा एक लाट निर्माण झालीये. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी श्रीलंकेत 10 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे श्रीलंकेत आयोजित स्पर्धा आता पाकिस्तानात खेळवण्याचा निर्णय दोन्ही बोर्डांनी घेतलाय.

अफगाणिस्तानचा संघ या आठवड्याच्या अखेरीस पाकिस्तानला रवाना होणार आहे. 3 सप्टेंबरपासून होणारी वनडे मालिका पाकिस्ताना खेळवण्यात येणार असल्याचे पक्के झाले असले तरी कोणत्या ठिकाणी सामने होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी मागील आठवड्यातच अफगाणिस्तान खेळाडू काबूलमध्ये ट्रेनिंगसाठी एकत्र आले होते.

वनडे मालिका पाकिस्तानात खेळवण्यात यावी, अशी ऑफर यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला दिली होती. पण अफगाणिस्तानने याला नकार दिला होता. अखेर पाकिस्तानला जे पाहिजे होतं तेच झाले असून आता ही मालिका पाकिस्तानात होईल. वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT