Tokyo Paralympics :...तरीही अफगाणिस्तानचा ध्वज फडकणारच!

24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत 163 देशातील जवळपास 4500 खेळाडू 22 खेळातील 540 क्रीडा प्रकारात भाग घेणार आहेत.
Tokyo Paralympics Afghanistan Flag
Tokyo Paralympics Afghanistan Flag E Sakal

Tokyo Paralympics : टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारोहामध्ये अफगाणिस्तानचा झेंडाही फडकताना दिसणार आहे. कार्यक्रमाला अवघ्या 24 तासांचा अवधी उरला असताना आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिकमध्ये समितीचे (IPC) प्रमुख अँड्रू पार्सन्स यांनी याची घोषणा केलीये. एकतेचा संदेश देण्यासाठी अफगाणिस्तानचा ध्वज फडकवला जाईल, असे अँड्रू पार्सन्स यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान संघटनेनं कब्जा केल्यामुळे अफगाणिस्तानमधील खेळाडूंना नाइलाजास्तव स्पर्धेतून माघार घ्यावी लागलीये. राजधानी काबूलमधून सर्व उड्डाने रद्द करण्यात आल्यामुळे खेळाडूंचा पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा मार्ग बंद झालाय.

Tokyo Paralympics Afghanistan Flag
IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी यजमानांना मोठा धक्का

पॅरा ऑलिम्पिक समितीचे प्रमुख प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, उद्घाटन समारोहाच्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्राच्या उच्चायुक्त कार्यालयातील एक प्रतिनिधी स्टेडियमवर उपस्थितीत असेल. हा प्रतिनिधी अफगाणिस्तानच्या ध्वजवाहक म्हणून जगाला एकजुटतेचा संदेश देईल. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत 163 देशातील जवळपास 4500 खेळाडू 22 खेळातील 540 क्रीडा प्रकारात भाग घेणार आहेत.

भारतीय खेळाडूंचा मोठा ताफा स्पर्धेसाठी सज्ज

भारताकडून या स्पर्धेत आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मोठा ताफा पाठवण्यात आलाय. भारताचे 54 खेळाडू 9 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत. मंगळवारी होणाऱ्या उद्घाटन समारोहात भारताचे 11 सदस्य सहभागी होणार आहेत. भारताकडून मरियप्पन थं गावेलू ध्वज वाहक असेल. त्याच्याशिवाय थाळीफेकपटू विनोद कुमार, भालाफेकपटू टेक चंद, वेटलिफ्टर जयदीप आणि सकीना खातून हे खेळाडूही कार्यक्रमात उपस्थितीत राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com