Olympics Games 2036  esakal
क्रीडा

Olympics Games 2036 : भारत 2036 चे ऑलिम्पिक... पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे वक्तव्य

भारताने पहिल्यांदाच दीवमध्ये बीच गेम्सचे आयोजन केलं होतं : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अनिरुद्ध संकपाळ

PM Narendra Modi Olympics Games 2036 : पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. त्यांनी चेन्नई येथे बोलताना ऑलिम्पिक 2036 बदद्ल एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी भारत 2036 चे ऑलिम्पिक गेम्स आणि 2029 चे युथ ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

चेन्नईत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'आपल्या देशाला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. मात्र आता कुठं आपण पहिल्यांदाच बीच गेम्सचं आयोजन केलं. भारताने दीवमध्ये बीच गेम्सचं आयोजन केलं होते. यामुळे बीच गेम्स आणि स्पोर्ट्स टुरिझममध्ये भारताने नवा अध्याय सुरू केला आहे.'

'या बीच गेम्समध्ये भारताचा पारंपरिक खेळ मल्लखांब यांचा देखील समावेश करण्यात आला होता. याचबरोबर आठ इतर खेळ देखील सामील करण्यात आले होते. देशभरातील 1600 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, 'बीज गेम्स आणि स्पोर्ट्स टुरिझममुळे भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील शहरांना यांचा मोठा फायदा होऊ शकतो. आपण 2036 चे ऑलिम्पिक गेम्स आणि 2029 चे युथ ऑलिम्पिक भारतात आयोजित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहोत.'

खेळ हे फक्त मैदानापुरतं मर्यादित नाहीत. त्यांची एक विशिष्ठ इकॉनॉमी आहे. यामध्ये युवकांसाठी रोजगारांच्या संधी आहेत. मी देशाला येत्या पाच वर्षात जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था करण्याची गॅरेंटी दिली आहे.'

'यामध्ये स्पोर्ट्स इकॉनॉमीची देखील वाढ व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. यामुळेच गेल्या 10 वर्षापासून आम्ही स्पोर्ट्स विषयक इतर क्षेत्रांचा देखील विकास करण्याचा प्रयत्न केला.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT