Rohit Sharma esakal
क्रीडा

Rohit Sharma : रोहित शर्मा टी 20 क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma T20 Record : भारताचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात एक मोठा माईलस्टोन पार केला. रोहित शर्मा आज आपला 150 वा आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळत आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी 20 इतिहासात 150 सामने खेळणारा रोहित शर्मा हा पहिलाच पुरूष खेळाडू ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांच्या यादीत आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग 134 टी-20 सामन्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर आयर्लंडचाच जॉर्ज डॉकरेल (128 सामने) आणि पाकिस्तानचा शोएब मलिक (124 सामने) यांचा नंबर लागतो.

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 14 महिन्यांच्या अंतरानंतर पुनरागमन केलं. अफगाणिस्तानविरूद्धच्या मोहाली येथे झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात तो खेळला होता. 2022 च्या टी 20 वर्ल्डकपनंतरचा तो रोहितचा पहिलाच सामना होता. विशेष म्हणजे रोहित टी 20 संघात नुसता परतला नसून तो कर्णधार देखील आहे.

रोहितच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आहे. त्याने 182 षटकार ठोकले आहेत. शिवाय, तो 3853 धावा करून फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत रोहितच्या पुढे कोहली हा एकमेव खेळाडू आहे.

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानला 172 धावात ऑल आऊट केले. भारताकडून अर्शदीप सिंगने 3 विकेट्स घेतल्या तर अक्षर पटेल आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यांना शिवम दुबेने एक विकेट घेत चांगली साथ दिली. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नईबने सर्वाधिक 57 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT