Riyan Parag : रियान परागने पुन्हा रणजी ट्रॉफीत केला मोठा धमाका; संजूच्या संघाविरूद्ध...

Riyan Parag Ranji Trophy
Riyan Parag Ranji Trophy esakal

Riyan Parag Ranji Trophy 2024 : राजस्थान रॉयल्सचा मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग जरी आयपीएलमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत असला तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठमोठे कारनामे करण्याचा सपाटाच लावला आहे. मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत सलग सहा अर्धशतकी खेळी करणाऱ्या रियान परागने आता रणजी ट्रॉफी 2024 मध्ये देखील मोठा धमाका करण्यास सुरूवात केली आहे.

Riyan Parag Ranji Trophy
Ind Vs Afg 2nd T20 Live Score : नईबनं चोपलं मात्र अक्षर पटेलने दिलासा दिला

रियान परागने केरळविरूद्धच्या सामन्यात 125 चेंडूत 116 धावांची शतकी खेळी केली. परागची ही यंदाच्या रणजी हंगामातील पहिल्या दोन सामन्यात सलग दोन शतकी खेळी केल्या आहेत. पहिल्या सामन्यात त्याने 104 चेंडूत शतक ठोकले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने सावध फलंदाजी केली.

दुसऱ्या सामन्यात आसामचा कर्णधार रियान परागला आपल्या संघाला फॉलोऑनपासून वाचवायचं होतं. त्याने शतकी खेळी करत हे काम करून दाखवलं. केरळविरूद्ध आसामने तिसऱ्या दिवशी आपल्या पहिल्या डावात 7 बाद 231 धावा केल्या आहेत.

Riyan Parag Ranji Trophy
Yuvraj Singh : आशिष नेहराला माझ्यासाठी गुजरात टायटन्समध्ये जॉब पाहण्यास सांगितलं मात्र त्यानं...

केरळने प्रथम फलंदाजी करताना सचिन बेबीची शतकी तर कृष्णा प्रसादने केलेल्या 80 धावांच्या जोरावर 419 धावा केल्या. केरळच्या या धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना आसामच्या संघाची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांचे पहिले तीन फलंदाज 25 धावात माघारी परतले.

यानंतर मात्र कर्णधार रियानने एक बाजू लावून धरली. त्याने केरळच्या प्रभावी माऱ्याचा चांगला सामना केला. त्याने एकट्याच्या जीवावर संघावरचा फॉलोऑन टाळला.


(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com