Rohit Sharma could Be a Better Test Captain than Virat Kohli  esakal
क्रीडा

रोहित विराटपेक्षाही चांगला कसोटी कर्णधार होऊ शकतो : वासिम जाफर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: भारताने कसोटी मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. यानंतर भारतीय कसोटी संघाचा (Indian Test Team) नवा कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) सर्वांनीत कौतुकाचा वर्षाव केला. आता भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरने (Wasim Jaffer) देखील रोहित शर्माचे कौतुक करत रोहित हा विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) चांगला कसोटी कर्णधार (Test Captain) होऊ शकतो असे वक्तव्य केले. भारताने मायदेशात एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने सगळ्या फॉरमॅटमध्ये मिळून सलग 14 सामने जिंकले आहेत. (Rohit Sharma could Be a Better Test Captain than Virat Kohli)

वासिम जाफरने इएसपीएल क्रिकेटइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा चांगला कसोटी कर्णधार होऊ शकतो. माहिती नाही की तो किती कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करेल मात्र मला वाटते की तो सर्वोत्तम कर्णधारांपैकी (Best Captain) एक आहे. त्याने प्रत्येक मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप दिली आहे. मला असे वाटते की भारतीय संघाचे नेतृत्व योग्य हातात आले आहे.

श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत जिंकल्यानंतर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहचला आहे. भारताचा आता पुढचा कसोटी सामना जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध होणार आहे. गेल्या वर्षी इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील पाचवा सामना कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT