
ऑस्ट्रेलियाला थकवायचं नाही हरवायचं आहे; अख्तरने काढला राजांना चिमटा
नवी दिल्ली : क्रिकेट जगतात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात झालेल्या कराची कसोटीची जोरदार चर्चा आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) 196 धावांची झुंजार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या 506 धावांचे आव्हान पार करण्यासाठी जोर लावला. मात्र त्यांना फक्त 63 धावा कमी पडल्या. अखेर पाचव्या दिवशी पाकिस्तानने दुसऱ्या डावात 7 बाद 443 धावांपर्यंत मजल मारली. जरी पाकिस्तानने 1030 चेंडू खेळून सामना अनिर्णित ठेवला असला तरी पाकिस्तानच्या पाटा खेळपट्ट्यांवर (Pakistan Flat Pitches) टीका होत आहे.
हेही वाचा: 'पाक खेळपट्टी तयार करू शकत नाही, भारताची मदत घ्या'
रावळपिंडी आणि कराची कसोटीतील पाटा खेळपट्ट्यांवरून पाकिस्तावर जगभरातूनच नाही तर मायदेशातूनही टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) पाटा खेळपट्ट्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) संचालक रमीझ राजा (Ramiz Raja) यांना चांगलाच चिमटा काढला. शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर पाकिस्तान आणि बाबर आझमच्या झुंजार खेळीचे कौतुक केले. मात्र त्याने पीसीबी चेअरमन रमीझ राजा यांना खेळपट्टीवरून धारेवर धरले. तो म्हणाला की, तुम्ही म्हणता मी आधी क्रिकेटर आहे मग चेअरमन आहे. मग चांगली खेळपट्टी का तयार करत नाही. जीव नसलेल्या खेळपट्ट्या तयार करत आहात. अशा प्रकारच्या क्रिकेटला काही अर्थच नाही. ऑस्ट्रेलियाच्या टीमला तुम्ही चांगलेच थकवले. मात्र मला वाटते की ऑस्ट्रेलियाला थकवायचं नाही तर हरवायचं आहे.
हेही वाचा: रणजीत खेळ भावनेला ठेंगा; धोनीच्या गावकऱ्यांनी कुटल्या 1297 धावा
ऑस्ट्रेलिया तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया तीन कसोटी सामने खेळणार आहे. त्यातील रावळपिंडी आणि कराची कसोटी अनिर्णित राहिली आहे. आता लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर 21 मार्च ते 25 मार्च दरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या कसोटीत फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयार करण्यासाठी पीसीबी (PCB) बाहेरून मदत मागवत आहे.
Web Title: Shoaib Akhtar Take A Dig On Pakistan Cricket Board Chairman Ramiz Raja Over Flat Pitches
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..