Rohit Sharma esakal
क्रीडा

Rohit Sharma : कॅप्टन रोहितचा टी 20 मध्ये जलवा, सर्वाधिक मालिका तर जिंकल्याच मात्र धोनीसोबतही केली बरोबरी

भारताने अफगाणिस्तानविरूद्धची मालिका जिंकली अन् रोहितने केला मोठा विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्माने तब्बल 14 महिन्यानंतर भारतीय टी 20 संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. संघात परतल्यानंतर त्याने विक्रमांची मालिकाच सुरू केली आहे. अफगाणिस्तानविरूद्धचा दुसरा टी 20 सामना जिंकून भारताने मालिका खिशात टाकली.

या मालिका विजयाबरोबरच रोहित शर्मा भारताचा सर्वाधिक टी 20 मालिका जिंकणारा कर्णधार ठरला आहे. तसेच रोहित शर्माने महेंद्रसिंह धोनीची देखील बरोबरी केली आहे. रोहित शर्मा आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी 20 सामने जिंकणारा कर्णधाऱ्यांच्या यादीत धोनीसोबत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात अफगाणिस्तानचा 6 विकेट्सनी पराभव केला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात फलंदाज म्हणून रोहित शर्मा 'शून्य' होता. मात्र कर्णधार म्हणून त्याने विक्रमी कामगिरी केली.

रोहितसोबतच भारताने आजच्या सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. ते विक्रम पुढील प्रमाणे :

भारताचे जून 2019 पासून मायदेशातील टी 20 मालिकांचे रेकॉर्ड

  • खेळलेल्या टी 20 मालिका - 15

  • जिंकलेल्या टी 20 मालिका - 13

  • बरोबरीत सुटलेल्या टी 20 मालिका - 2

  • पराभूत टी 20 मालिका - 0

टी 20 मध्ये अफगाणिस्तानविरूद्ध सर्वात मोठा धावांचा पाठलाग

  • 2022 - श्रीलंकेने 176 धावांचे आव्हान केले पार

  • 2024 - भारताने 173 धावांचे आव्हान केले पार

  • 2022 - आयर्लंडने 169 धावांचे आव्हान केले पार

  • 2015 - हाँगकाँगने 163 धावांचे आव्हान केले पार

टी 20 मध्ये अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंची सर्वोच्च धुलाई

  • 2024 - भारत, सरासरी 13.85, 7 षटकात 97 धावा

  • 2010 - भारत, सरासरी 10.21, 7.5 षटकात 80 धावा

  • 2013 - आयर्लंड, सरासरी 10.18, 11 षटकात 112 धावा

  • 2021 - भारत, सरासरी 9.71, 7 षटकात 68 धावा

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

AI Revolution: तुम्ही फक्त उद्योग सुरू करण्याचे धाडस करा, AI एजंट्सच चालविणार तुमचा बिझनेस? कसे ते वाचा...

SCROLL FOR NEXT