IND vs AFG : दिवस डावखुऱ्यांचा! होळकर स्टेडियमवर यशस्वी - शिवमच्या वादळापुढे अफगाणींचा चुराडा

IND vs AFG
IND vs AFGesakal

IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताच्या डावखुऱ्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात अफगाणिस्तानचा 6 विकेट्सनी पराभूत केलं. भारताने अफगाणिस्तानचे 173 धावांचे आव्हान 15.4 षटकात पूर्ण केले.

भारताकडून डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वालने 68 धावांची आक्रमक खेळी केली. तर त्याला साथ देणाऱ्या शिवम दुबेने 32 चेंडूत 63 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी रचली. तत्पूर्वी गोलंदाजीतही दोन डावखुऱ्या गोलंदाजांनी भरीव कामगिरी केली. अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर अक्षर पटेलने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

IND vs AFG
Rohit Sharma : रोहित शर्मा टी 20 क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने प्रथम गोलंदाजी करत अफगाणिस्तानचा डाव 172 धावात गुंडाळला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. भारताचा कर्णधार पुन्हा एकदा शुन्यावर बाद झाला. फजलहक फारूकीने त्याचा शुन्यावर त्रिफळा उडवला.

मात्र यानंतर यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने पॉवर प्लेमध्ये धावांचा पाऊस पाडणं सुरूच ठेवलं. या दोघांनी अवघ्या 4.2 षटकात 57 धावांची भागीदारी रचत संघाला 62 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र पॉवर प्ले संपायला आला असतानाच विराट कोहली 16 चेंडूत 29 धावा करून बाद झाला.

IND vs AFG
Riyan Parag : रियान परागने पुन्हा रणजी ट्रॉफीत केला मोठा धमाका; संजूच्या संघाविरूद्ध...

विराट कोहली बाद झाल्यानंतर आलेल्या शिवम दुबेने यशस्वीला उत्तम साथ दिली. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जयस्वालने पॉवर प्लेनंतर देखील आपला धडाका कामय ठेवला. या दोघांनी बघता बघता संघाला दीडशतकी मजल मारून दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 7 षटकात 92 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी शतकी मजल मारण्यापूर्वीच यशस्वी 68 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला जितेश शर्मा देखील शुन्यावर बाद झाला.

यानंतर शिवम दुबेने रिंकू सिंहच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शिवम दुबेने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने 32 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. भारताने अफगाणिस्तानचे 173 धावांचे आव्हान 15.4 षटकातच पार केलं.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com