Ruturaj Gaikwad IND vs NZ 1st T20I esakal
क्रीडा

IND vs NZ 1st T20I : न्यूझीलंड टी 20 मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का; धडाकेबाज सलामीवीर दुखापतीमुळे आऊट

अनिरुद्ध संकपाळ

Ruturaj Gaikwad IND vs NZ 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका उद्यापासून (27 जानेवारी) सुरू होत आहे. मात्र त्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा आक्रमक सलामीवीर ऋतुराज गायकवाड संपूर्ण मालिकेला मुकला आहे. ऋतुराज गायकवाडच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत दाखल झाला आहे.

ऋतुराज गायकवाड गेल्या काही काळापासून रणजी ट्रॉफी खेळत आहे. महाराष्ट्राचा कर्णधार असलेला गायकवाड हैदराबादविरूद्धच्या सामन्यात खेळला होता. त्याने दोन डावात 8 आणि 0 धावा केल्या होत्या. या सामन्यानंतर त्याने आपल्या मनगटाच्या दुखापतीबाबत बीसीसीआयला कळवले. ऋतुराज गायकवाडला दुसऱ्यांदा मनगटाती दुखापत झाली आहे. तो गेल्या वर्षी देखील श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेला याच दुखापतीमुळे मुकला होता.

मिळालेल्या माहितीनुसार ऋतुराज गायकवाडच्या सततच्या दुखापतींमुळे संघ व्यवस्थापन वैतागलं आहे. तो अनेक मालिका दुखापतींमुळे किंवा आजापणामुळे खेळू शकत नाही. जरी ऋतुराज दुखापतीमुळे मालिका मुकला असला तरी त्याची रिप्लेसमेंट देण्यात आलेली नाही. कारण संघात पृथ्वी शॉचे पुनरागमन झाले आहे.

रविंद्र जडेजाचा फिटनेस रिपोर्ट

बीसीसीआय रविंद्र जडेजा दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे की नाही याबाबतची समिक्षा 1 फेब्रुवारीला करणार आहे. रविंद्र जडेजाची ऑस्ट्रेलिया सोबत होणाऱ्या कसोटी मालिकेसाठीच्या पहिल्या दोन कसोटीसाठी निवड झाली आहे. मात्र त्याची निवड ही तो कितपट फिट आहे त्यावर अवलंबून राहणार आहे. सध्या जडेजा रणजी ट्रॉफी खेळत आहे. त्याला तिथे आपला मॅच फिटनेस सिद्ध करतायचा आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन, हर घर तिरंगा अन् हर मन तिरंगा

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT