Republic Day : विराट कोहलीचे 26 जानेवारीशी आहे खास नाते; 11 वर्षापूर्वी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Republic Day

Republic Day : विराट कोहलीचे 26 जानेवारीशी आहे खास नाते; 11 वर्षापूर्वी...

Virat Kohli Republic Day : संपूर्ण देश आज आपला 74 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनी देशातील अनेक सेलिब्रेटींनी देशवासीयांना प्रजासत्ता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यात भारताचा रन मशीन विराट कोहलीने देखील शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे विराट कोहलीचे आणि 26 जानेवारीचे खूप खास नाते आहे.

विराट कोहलीने 26 जानेवारी 2012 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध शतक ठोकले होते. हे विराटसाठी एक खास शतक आहे. कराण त्याचे हे कसोटी क्रिकेटमधील पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते. विराटने एडिलेडमध्ये आपले पहिले कसोटी शतक ठोकले. मात्र या शतकानंतर भारतीय संघ 298 धावांनी पराभूत झाला.

एडिलेड कसोटीमध्ये गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यासारखे अनुभवी खेळाडू फारशी चमक दाखवू शकले नाहीत. दुसरीकडे युवा विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर आपले पाय विकेटवर रोवले. त्याने 213 चेंडूत 116 धावांची शतकी खेळी केली. यात त्याने 11 चौकार आणि एक षटकार मारला.

विराट कोहली गेली दोन वर्षे बॅड पॅचमधून जात होता. त्याच्या बॅटमधून मोठी खेळी होत नव्हती. अखेर त्याने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 सामन्यात शतकी खेळी केली अन् आपला शतकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर विराट कोहलीने शतकांचा रतीब पुन्हा एकदा सुरू केला आहे.

विराट कोहलीने श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत आपले 46 वे वनडे शतक ठोकले. विराटची कसोटीत 27 शतके झाली आहेत. तर टी 20 मध्ये विराटच्या बॅटमधून एक शतक आले आहे. विराट सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या यादीत 74 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या समोर आता फक्त सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या शतकाचा विक्रम आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा