जोकोविचला सरावाच्या वेळी मार्गदर्शन करताना अगासी. 
क्रीडा

जोकोविचचा ‘मेंटॉर’ अगासींना ‘बाय-बाय’

सकाळवृत्तसेवा

लंडन - पुनरागमनात सारखा अपयशी ठरत असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने सुपर कोच तसेच एक काळ गाजविलेले दिग्गज आंद्रे अगासी यांना बाय-बाय केला आहे.

अगासी ४७ वर्षांचे असून, त्यांनी ईएसपीएनला एका निवेदनाद्वारे ही माहिती कळविली. त्यांनी म्हटले आहे, की नोव्हाकला मी केवळ सर्वोत्तम हेतूनेच मदत करण्याचा प्रयत्न केला, पण आमचे वारंवार दुमत होत होते. असहमती दर्शविण्यासाठी सहमत होण्याचे प्रसंग सारखे येत राहिले. पुढे वाटचाल करण्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो.

गेल्या वर्षी मे महिन्यात पार्टटाइम मेंटॉर म्हणून सक्रिय होण्यास अगासी यांनी तयारी दर्शविली होती. निवडक स्पर्धांसाठी ते जोकोविचला मार्गदर्शन करणार होते. पत्नी तसेच महिला टेनिसची साम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने अगासी यांचे मन वळविले होते. जोकोविचसुद्धा तेव्हा फार उत्सुक होता. तो म्हणाला होता, की भविष्यात काय घडते ते आम्ही पाहू. एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ही भागीदारी कशी पुढे जाते याची उत्सुकता आहे.

फ्रेंच ओपनपूर्वी ही भागीदारी आकारास आली, पण जोकोविचला अपेक्षित यश येऊ शकले नाही.

आता चेक प्रजासत्ताकाचे माजी टेनिसपटू रॅडेक स्टेपानेक हेच त्याचे एकमेव मार्गदर्शक असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

आगीत घर गमावलेल्यांना मोठी मदत! आग घटनेत बेघर झालेल्यांना जमीन देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय; पण नेमकं कुणाला आणि कुठे?

बायकोनं केलेला आरोप खरा ठरला? खरंच थलपती विजयचं अभिनेत्रीसोबत अफेअर? सोशल मीडियावर दोघांचा Viral Video

US Missile Test: ‘डुम्सडे मिसाईल’ची यशस्वी चाचणी; अमेरिकेकडून पुन्हा शक्तिप्रदर्शन

Ro-Ro Boat: रो-रो फेरी सुरू होताच बंद, प्रवाशांचे आरक्षण पैसे परत; नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT