स्मृती मानधना sakal
क्रीडा

Sports: उपकर्णधार स्मृती मानधनाचा घोडावत विद्यापीठात प्रवेश

‘स्मृती मानधनाने बी.कॉम. प्रवेशासाठी संजय घोडावत विद्यापीठाची निवड केली हा आमच्यासाठी गौरव आहे. तिच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी मदत करू.’ संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी स्मृती मानधना हिचे येथील प्रवेशाबद्दल स्वागत केले.

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर- भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने संजय घोडावत विद्यापीठात बी.कॉम. प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. याबाबतची माहिती घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.

भोसले म्हणाले, ‘स्मृती मानधनाने बी.कॉम. प्रवेशासाठी संजय घोडावत विद्यापीठाची निवड केली हा आमच्यासाठी गौरव आहे. तिच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी मदत करू.’ संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी स्मृती मानधना हिचे येथील प्रवेशाबद्दल स्वागत केले. विद्यापीठाच्या शिरपेचात हा हिरा गवसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘विद्यापीठ नेहमीच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठबळ देते. यापूर्वी अठरा वर्षांखालील गटात लॉन टेनिस प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या ऐश्वर्या जाधव हिला

आम्ही प्रवेश देऊन सर्वतोपरी मदत करत आहोत. येथील क्रीडापटू ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. विद्यापीठाची घोडदौड सर्वोत्कृष्टतेकडे होत आहे.’

कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. योगेश्वरी गिरी यांनीही स्मृती मानधनाचे स्वागत केले.

संजय घोडावत विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रीडा व शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट सोयीनियुक्त विद्यापीठ आहे. या परिसरात आल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा मिळते. येथे क्रीडापटूंसाठी उत्तम क्रीडा साधने व क्रीडांगण उपलब्ध असल्याने या विद्यापीठात प्रवेश घेण्याचे निश्चित केले.

- स्मृती मानधना, उपकर्णधार, भारतीय महिला क्रिकेट संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT