Pune News : कोरोनानंतरही वास ओळखण्याची क्षमता बाधीत; आयसर पुणेचे संशोधन

कोरोनातून बरे झालेल्या ८० टक्के रुग्णांमधील वास ओळखण्याची क्षमता बाधित झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.
IISER
IISERsakal
Summary

कोरोनातून बरे झालेल्या ८० टक्के रुग्णांमधील वास ओळखण्याची क्षमता बाधित झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

पुणे - कोरोनातून बरे झालेल्या ८० टक्के रुग्णांमधील वास ओळखण्याची क्षमता बाधित झाल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. पुण्यातील विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) डॉ. निक्सन अब्राहम यांनी यासंबंधीत केलेले संशोधन ‘करंट रिसर्च इन न्यूरोबायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशीत झाले आहे.

कोरोनातून बहुतेक रुग्ण बरे झाले आहेत, परंतु असे अनेकांनी वास घेण्याची क्षमता गमावली आहे. डॉ. निक्सन यांच्या नेतृत्वात राजदीप भौमिक, मीनाक्षी परदासनी, सारंग महाजन, राहुल मगर, समीर व्ही. जोशी, गणेश नायर, अनिंद्य भट्टाचार्य यांनी हे संशोधन केले. यासाठी बी.जे. वैद्यकीय (ससून) महाविद्यालयाची मदत घेण्यात आली. संशोधकांनी अचूक निदानासाठी सहभागींचे चार प्रमुख गटांत विभागणी केली. ज्यामध्ये कोरोनाची लक्षणे नसलेले, विषाणूचे वाहक असलेले, बरे झालेले आणि निरोगी व्यक्तींची निवड करण्यात आली होती.

असे झाले संशोधन..

- शास्त्रज्ञांच्या चमूने प्रयोगशाळेतच ‘अल्पोक्सोमीटर’ विकसित केले आहे.

- ज्याद्वारे कोविडमधून बरे झालेल्या २०० रुग्णांची चाचणी करण्यात आली.

- यामध्ये त्यांनी संबंधितांना वास घेण्यासाठी १० प्रकारचे गंध दिले.

- प्रयोगात सहभागींच्या वास घेण्याच्या क्षमतेचे निरीक्षणे करण्यात आली.

- त्यातील ८० टक्के रुग्णांच्या वास ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

- अनेक रुग्णांना वास ओळखता आला नाही.

संशोधनाचे निष्कर्ष -

- प्रथम शास्त्रज्ञांनी विकसित केलेले ‘अल्पोक्सोमीटर’ अचूक असल्याचे सिद्ध झाले

- लक्षणे नसलेले रुग्ण आणि लक्षणे नसलेल्या वाहकांमधील गंध शोधण्याच्या क्षमतेत फरक दिसून आला

- कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमधील घ्राणेंद्रीयाची हुंगण्याची क्षमता प्रभावीत झाली

परिणाम न्यूरल सर्किटवर

डॉ. अब्राहम यांच्या संशोधनानुसार, कोरोना संसर्गानंतर रुग्णांच्या न्यूरल सर्किट्सवर विपरीत परिणाम दिसून आले आहेत. ही बाब मेंदूशी संबंधित आहे, जिथे वासाची जाणीव जाणीव असते. याचा परिणाम बहुतांश रुग्णांवर होतो. कोविडमधून बरे झाल्यानंतर अनेकांमध्ये वास ओळखण्याची क्षमता पुन्हा आली आहे, परंतु असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचा वास ओळखता येत नाही.

गंधाच्या संवेदनांचे इतके अचूक प्रमाणीकरण आम्ही विकसीत केलेल्या ऑल्फॅक्टोमीटरमुळे शक्य झाले. ज्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे घ्राणेंद्रीयांच्या संवेदी आणि संज्ञानात्मक दोन्ही कमतरतांबद्दल माहिती मिळू शकली. न्यूरोडीजनरेटिव्ह परिस्थिती आणि घ्राणेंद्रीयावर परिणाम करणाऱ्या संक्रमणांची तपासणी करण्यासाठी ही पद्धत आणखी विकसित करण्यात येईल.

- डॉ. निक्सन अब्राहम, शास्त्रज्ञ,आयसर, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com