PV Sindhu Twitter
क्रीडा

Olympics : पहिली मॅच सिंधूनं अर्ध्या तासाच्या आत जिंकली

दुसऱ्या फेरीत सिंधूची लढत ही 34 व्या स्थानावर असलेल्या हाँकाँगच्या चियुंग एंगान यी हिच्याशी होणार आहे.

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 PV Sindhu : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील चॅम्पियन आणि रिओ ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेत्या पीव्ही सिंधूने (PV Sindhu) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) विजयी सलामी दिली. बॅडमिंटन महिला एकेरीत तिने इस्त्रायलच्या सेनिया पोलिकारपोवा हिला सरळ सेटमध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीत 7 व्या स्थानावर असलेल्या सिंधूनं 58 व्या मानांकित प्रतिस्पर्धी खेळाडूला अवघ्या 28 मिनिटात 21-7, 21-10 असे पराभूत केले. दुसऱ्या फेरीत सिंधूची लढत ही 34 व्या स्थानावर असलेल्या हाँकाँगच्या चियुंग एंगान यी हिच्याशी होणार आहे. या सामन्यातही सिंधूचे पारडे जड मानले जात आहे.

सलामीच्या सामन्यात सिंधूने आक्रमक सुरुवात केली. पण सुरुवातीला ती 3-4 अशी पिछाडीवर होती. अनुभवी सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला चुका करायला भाग पाडत ब्रेकपर्यंत सामन्या 11-5 अशी आघाडी घेतली. त्यानंतर तिने सलग 13 पाँइट मिळवतले. सिंधूने क्रॉसकोर्ट स्मॅशचा पूरेपूर वापर करत प्रतिस्पर्धी खेळाडूवरील दबावात टाकले. तिने पहिला सेट सहज आपल्या नावे केला.

दुसऱ्या बाजूला गुडघ्याला पट्टी बाधूंन खेळणाऱ्या इस्त्रायली सेनिया संघर्ष करताना दिसली. दुसऱ्या सेटमध्ये ब्रेकपर्यंत सिंधून 9-3 अशी मजबूत आघाडी घेतली होती. सिंधूने आपला दबदबा कायम ठेवत हा सेटही आपल्या नावे केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

Baramati Crime News : बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास; अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरटयांचा धुमाकूळ....

SCROLL FOR NEXT