esakal | Olympics Medal Tally : चीन टॉपर एका रौप्यसह भारत बारावा
sakal

बोलून बातमी शोधा

mirabai chanu medal tokyo

Olympics Medal Tally : चीन टॉपर एका रौप्यसह भारत बारावा

sakal_logo
By
सुशांत जाधव

Olympic Points Table 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 23 जुलैपासून जगातील मानाची स्पर्धा समजली जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झालीये. दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात पदकाची सेरेमनी पार पडली. दुसऱ्या दिवसाअखेर चीनने सर्वाधिक 3 सुवर्ण आणि एका ब्राँझसह सर्वाधिक चार पदके पटकावली. चीनी महिला खेळाडूने 10 मीटर रायफल इवेंटमध्ये सुवर्ण कामगिरी करत स्पर्धेतील पहिले गोल्ड पदक चीनच्या खात्यात जमा केले. दुसऱ्या दिवसाअखेर एका रौप्यसह भारत बेल्जियम आणि स्पेनसह पदतालिकेत 12 व्या स्थानावर आहे. यंदाच्या स्पर्धेत जगभरातील 205 देशांतील 11 हजार खेळाडू टोकियो नगरीत दाखल झाले आहेत. 43 ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

देश सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण

चीन 3 - 1 4

इटली 1 1 - 2

जपान 1 1 - 2

कोरिया 1 2 - 3

एक्वेडोर 1 - - 1

हंगेरी 1 - - 1 1

इराण 1 - - 1

कोसोवो 1 - - 1

थायलंड 1 - - 1

आरओसी - 1 1 2

सर्बिया - 1 1 2

बेल्जियम - 1 - 1

स्पेन - 1 - 1

भारत - 1 - 1

loading image
go to top