Virat Kohli

 

esakal

क्रीडा

Virat Kohli breaks Viv Richards' record : विराट कोहलीने २०२५च्या शेवटच्या दिवशी मोडला विव्ह रिचर्ड्स यांचाही विक्रम!

Virat Kohli New record : अशी कामगिरी करणारा विराट कोहली आता जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे; जाणून घ्या, नेमका कोणता आहे रेकॉर्ड?

Mayur Ratnaparkhe

Virat Kohli Breaks Viv Richards’ Historic Record : भारताची रन मशीन अर्था धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने या २०२५ च्या अखेरीस आपल्या नावावर आणखी एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. शिवाय त्याने वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू विव्ह रिचर्ड्स यांचाही विक्रम मोडला आहे.                                   

विराटने नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांमध्ये ३०२ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक होते. या मालिकेतील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, तो आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्माच्या नंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आणि एक मोठा विक्रम प्रस्थापित केला.

विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत दहाव्यांदा आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या दोनमध्ये राहत एक कॅलेंडर वर्ष पूर्ण केले आहे. २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये विराटने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर-१ फलंदाज म्हणून आपले वर्ष संपवले. २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०२१ आणि २०२५ मध्ये तो आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहिला. आतापर्यंत इतर कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही.

याशिवाय, विराटने वेस्ट इंडिजचे माजी महान क्रिकेटपटू विव्ह रिचर्ड्स यांचा जुना विक्रम मोडला आहे. रिचर्ड्स यांनी त्यांच्या कारकिर्दीत नऊ वेळा पहिल्या दोन स्थानात राहून एक कॅलेंडर वर्ष पूर्ण केले होते. आतापर्यंत फलंदाजांमध्ये हा विक्रम कोहली आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांच्याकडे संयुक्तपणे होता. मात्र आता विराट कोहली जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे, ज्याने ही कामगिरी बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT