Virat Kohli Anushka Sharma Vamika esakal
क्रीडा

Virat Kohli : 'विराट' शतक फक्त अनुष्का अन् वामिकाचेच!

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Anushka Sharma Vamika : विराट कोहली जोपर्यंत 71 वा शंभर करणार नाही तोपर्यंत तो फॉर्ममध्ये आलेला नाही अशी आपली धारणा झाली होती. अखेर आपल्या धारणेचे मान राखत विराट कोहलीने अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 सामन्यात धडाकेबाज शतकी खेळी केली. मात्र ही शतकी खेळी विराटच्या फॅन्स, टीम किंवा प्रशिक्षकांना समर्पित नाही तर ही शतकी खेळी फक्त आणि फक्त विराटची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका यांना समर्पित आहे. कराण या दोघींनीच विराट कोहलीला त्याच्या कठिण काळात साथ दिली. (Virat Kohli Dedicated His 71st International Century To Wife Anushka And Daughter Vamika)

विराट कोहलीने आपले बहुप्रतिक्षित 71 वे शतक ठोकल्यानंतर गळ्यातील लॉकेटला किस केला. विराटने शतकानंतर कोणतेही अवास्तव सेलिब्रेशन केले नाही. मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक दिलासादायक हास्य होते. हे हास्यच सर्व काही सांगून जात होते. आपली 61 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांनी सजवलेली नाबाद 122 धावांची खेळी संपवल्यानंतर विराट कोहलीने सामन्याच्या मधील प्रेझेंटेशन कार्यक्रमात सांगितले की त्याचे हे 71 वे शतक हे त्याची पत्नी अनुष्क शर्मा आणि मुलगी वामिकाला समर्पित आहे. विराट म्हणाला, 'यावेळी फक्त एकच विशेष व्यक्ती आहे जी कठिण काळात माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. तिने सर्व काही पाहिले ती म्हणजे अनुष्का.'

जवळपास 1121 दिवसांनी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. आशिया कपमधील भारताच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरूद्ध त्याने 61 चेंडूत नाबाद 122 धावा ठोकल्या. त्याने आपले 71 वे शतक पूर्ण करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विशेष म्हणजे विराट कोहलीचे हे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटधील पहिलेच शतक आहे. त्याला ही टी 20 शतकी खेळी करण्यास सामन्यांचे शतक पार करावे लागले. मात्र 'देर आये दुरुस्त आये' प्रमाणे या शतकाने अनेक विक्रम केलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT