Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वरच्या धावा कमी विकेट्स जास्त; भारताचा 101 धावांनी विजय

Bhuvneshwar Kumar 5 Wickets Virat Kohli Century
Bhuvneshwar Kumar 5 Wickets Virat Kohli Centuryesakal

IND vs AFG Asia Cup 2022 Bhuvneshwar Kumar 5 Wickets Virat Kohli Century

दुबई : भुवनेश्वर कुमारचा भेदक मारा आणि विराट कोहलीचे प्रतिक्षित 71 व्या शतकाच्या जोरावर भारताने आशिया कपमधील आपल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला. भारताने आशिया कपचा शेवट गोड केला. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात अवघ्या 4 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 122 धावांची तुफानी खेळी केली. त्याला कर्णधार केएल राहुलने 62 धावा करून चांगली साथ दिली. अफगाणिस्तानकडून इब्राहीम झादरानने 64 धावंची झुंजार खेळी करत अफगाणिस्तानला शतक (111) पार करून दिले.

Bhuvneshwar Kumar 5 Wickets Virat Kohli Century
Virat Kohli 71st Century : 'शतक' एक शिकार अनेक! विराटने पाँटिंग, रोहित अन् स्वतःलाही टाकले मागे

भारताने ठवलेल्या 212 धावांचे अवाढव्य आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या अफगाणिस्ताचा डाव पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळला. भारताने पॉवर प्लेमध्येच अफगाणिस्तानची अवस्था 5 बाद 20 धावा अशी केली. यात भुवनेश्वर कुमारच्या 4 विकेट्सचा समावेश होता. तर अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली होती.

त्यानंतर भुवनेश्वरने अझमतुल्ला ओमरझाईला 1 धावांवर बाद करत आपली पाचवी शिकार केली. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 4 धावा देत 5 विकेट घेतल्या. दरम्यान, इब्राहीम झादरान आणि राशिद खान यांनी अफगाणिस्तानला अर्धशतक पार करून दिले.

मात्र दीपक हुड्डाने 15 धावा करणाऱ्या राशिद खानला बाद करत अफगाणिस्तानला सातवा धक्का दिला. त्यानंतर अश्विने मुजीबचा 18 धावांवर त्रिफळा उडवत आठवा अफगाण माघारी धाडला. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इब्राहीम जादरानने झुंजार 64 धावांची खेळी करत अफगाणिस्तानला शतक पार करून दिले.

Bhuvneshwar Kumar 5 Wickets Virat Kohli Century
Virat Kohli : अखेर 1121 दिवसांची प्रतिक्षा संपली! 71 वे 'विराट' शतक साकारले

तत्पूर्वी, आशिया कपच्या भारत आणि अफगाणिस्तान सामन्यात भारतीय सलामी जोडी केएल राहुल आणि विराट कोहली यांनी फायरी स्टार्ट दिला. या दोघांनी 11 व्या षटकात भारताचे शतक धावफलकावर लावले. विराट कोहलीने 32 चेंडूत अर्धशतक ठोकले तर केएल राहुलने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

मात्र 119 धावांची शतकी सलामी दिल्यानंतर अफगाणिस्तानच्या फरीद अमहम मलिकने ही जोडी फोडली. त्याने 62 धावांवर केएल राहुलला बाद केले. राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. मात्र पुढच्याच चेंडूवर फरीदने सूर्याचा त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला.

यानंतर मात्र विराट कोहलीने आपला गिअर बदलला. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत आपले बहुप्रतिक्षित 71 वे शतक ठोकले. विशेष म्हणजे विराट कोहलीचे हे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले विहिले शतक आहे. ही शतकी खेळी करण्यासाठी विराट कोहलीला टी 20 सामन्यांचे शतक पार करावे लागले. त्याच्या नाबाद 122 धावांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानविरूद्ध 20 षटकात 2 बाद 212 धावा ठोकल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com