IND vs AUS 3rd ODI Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : इशान किशनच्या अनुपस्थितीत रोहितसोबत विराट येणार सलामीला, राजकोटच्या 4 खेळाडूंना लागली लॉटरी

इशान किशनच्या अनुपस्थितीत रोहितसोबत विराट...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 3rd ODI Virat Kohli : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघातील अनेक खेळाडूंना विश्रांती दिली आहे तर काही खेळाडू आजारी आहेत. त्यामुळे संघात मोठे बदल झाले आहेत. विशेष म्हणजे आज रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला उतरण्याची शक्यता आहे. कारण भारताचे दोन्ही सलामीवीर शुभमन गिल आणि इशान किशन हे उपलब्ध नाहीयेत.

राजकोटवर होत असलेल्या सामन्यात इशान किशन हा शुभमन गिलच्या अनुपस्थितीत सलामीला येण्याची शक्यता होती. मात्र तो देखील आजारी पडल्यामुळे त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. विराट कोहली हा कायम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. मात्र आजच्या सामन्यात तो कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची दाट शक्यता आहे.

बीसीसीआयने आज तिसरा सामना सुरू होण्यापूर्वी एक ट्विट केले. या ट्विटनुसार धर्मेंद्र जडेजा, प्रेरक मंकड, विश्वराज जडेजा आणि हर्विक देसाई हे भारतीय संघाला ड्रिंक्स टाईमवेळी मदत करतील तसेच गरज लागल्यास फिल्डिंग करण्यासाठी देखील मैदानावर उतरतील.

तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताची प्लेईंग ११ :

रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT