IND vs AUS 3rd ODI : अखेर कांगारू जिंकले; तिसऱ्या वनडे सामन्यात मॅक्सवेल ठरला हिरो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS 3rd ODI LIVE

IND vs AUS 3rd ODI : अखेर कांगारू जिंकले; तिसऱ्या वनडे सामन्यात मॅक्सवेल ठरला हिरो

India Vs Australia 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचे 66 धावांनी पराभव केला. कांगारूंनी ठेवलेल्या 353 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सर्वबाद 286 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 81 धावा केल्या तर विराट कोहलीने 56 आणि श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले. रविंद्र जडेजाने देखील 35 धावांची खेळी करत शेवटपर्यंत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 4 तर जॉस हेजलवूडने दोन विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 बाद 352 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने 96 धावा केल्या. तर स्मिथने 74, मार्नस लाबुशेनने 72 धावांचे योगदान दिले. डेव्हिड वॉर्नरने देखील 56 धावा करत अर्धशतकी खेळी केली.

ऑस्ट्रेलियाने 30 षटकात 2 बाद 230 धावा केल्या होत्या. मात्र पुढच्या 20 षटकात भारताने कमबॅक करत त्यांचे 5 फलंदाज फक्त 122 धावा देत बाद केले. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या.

249-6 : भारताची मधली फळी गारद 

भारताने 30 षटकातच 200 धावांचा टप्पा ओलांडला. मात्र त्यानंतर भारताचा डाव घसरला. केएल राहुल 26 तर सूर्यकुमार यादव 8 धावा करून बाद झाला. यानंतर 43 चेंडूत 48 धावा करणारा श्रेयस अय्यर देखील बाद झाला. त्याचा मॅक्सवेलने त्रिफळा उडवला.

202-3 (31.3 Ov) : भारताने 200 धावा केल्या पार 

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. मात्र रोहित 81 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव पुढे नेला. मात्र विराट अर्धशतकानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेलची शिकार झाला. मॅक्सवेलने आपली तिसरी शिकार केली होती.

78-1 (12 Ov) : भारताची दमदार सुरूवात 

भारताने ऑस्ट्रेलियाच्या 353 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने देखील दमदार सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदरने 12 षटकात 74 धावा केल्या. अखेर मॅक्सवेलने त्याला 18 धावांवर बाद केले.

299-6  : कांगारूंचा निम्मा संघ गारद 

अखेर जसप्रीत बुमराहने कांगारूंना दोन धक्के देत त्यांची अवस्था 5 बाद 281 धावा केल्या. यानंतर मार्नसने डाव सावरत संघाला 43 व्या षटकात 300 धावांच्या जवळ नेले. मात्र कुलदीप यादवने ग्रीनला 9 धावांवर बाद करत कांगारूंना सहावा धक्का दिला.

242-3 : सिराजने स्मिथचा अडसर केला दूर 

61 चेंडूत 74 धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला मोहम्मद सिराजने बाद करत कांगारूंना तिसरा धक्का दिला. मात्र त्यानंतर लाबुशेनने ऑस्ट्रेलियाला 250 च्या पार पोहचवले.

AUS 237/2 (31) : कांगारूंनी केली चांगलीच धुलाई

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्शने 84 चेंडूत 96 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाला 200 पार पोहचवले होते. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी रचली. मात्र कुलदीप यादवने त्याला 96 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

135-1 (17.3 Ov) : मार्शचेही अर्धशतक

डेव्हिड वॉर्नर पाठोपाठ मिचेल मार्शने देखील अर्धशतक ठोकत ऑस्ट्रेलियाला 18 व्या षटकापर्यंत 135 धावांपर्यंत मजल मारून दिली.

78-1 : अखेर प्रसिद्ध कृष्णाने फोडली जोडी 

डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी करत मार्शसोबत 78 धावांची सलामी दिली. मात्र ही जोडी प्रसिद्ध कृष्णाने फोडली. त्याने वॉर्नरला 56 धावांवर बाद केले.

AUS 65/0 (7) : डेव्हिड वॉर्नरची फटकेबाजी

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 7 षटकात 65 धावांपर्यंत मजल मारून दिली. वॉर्नरने 28 चेंडूत नाबाद 43 धावा चोपल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी कांगारूंचे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जॉश हेजलवूड हे तीनही तगडे गोलंदाज खेळणार आहेत. भारतही विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत मैदानात उतरणार आहे.