Volleyball esakal
क्रीडा

Volleyball: व्हॉलिबॉल खेळाडूंना मिळणार शिष्यवृत्ती!महाराष्ट्रातील उदयोन्मुख व्हॉलिबॉल खेळाडूंसाठी दत्तक योजना

व्हॉलिबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील (कोल्हापूर) यांच्या दिशा अकॅडमी, बाचणी (जि. कोल्हापूर) भारतीय व्हॉलिबॉलप्रेमी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील उदयोन्मुख व्हॉलिबॉल खेळाडूंसाठी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gadchiroli Volleyball Scholaraship : व्हॉलिबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील (कोल्हापूर) यांच्या दिशा अकॅडमी, बाचणी (जि. कोल्हापूर) आणि भारतीय व्हॉलिबॉलप्रेमी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील उदयोन्मुख व्हॉलिबॉल खेळाडूंसाठी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट १० खेळाडू निवडून त्यांना दरमहा ३ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

खेळाडूंची निवड शारीरिक क्षमता चाचणी घेऊन केली जाणार आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटातील खेळाडूंची यात निवड केली जाणार आहे. संबंधित खेळाडू ३१ डिसेंबर २०२४ रोजी १४ वर्षांपेक्षा कमी आणि १२ वर्षांपेक्षा जास्त असावा.

निवडलेल्या खेळाडूंच्या पालकांचे संमतीपत्र गरजेचे आहे. निवड झालेल्या खेळाडूंना व्हॉलिबॉल खेळाबरोबरच शालेय शिक्षण दिले जाणार आहे. हे खेळाडू दिशा अकॅडमी येथे निवासी संकुलात प्रवेशित केले जातील. त्यांना शास्त्रशुद्ध क्रीडा मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण आणि सकस आहार दिला जाणार आहे.

राज्य संघटना आणि शासकीय क्रीडा स्पर्धेतही त्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय पातळीवर खेळणार्‍या खेळाडूंना भारतीय सैन्य दल, पोलिस दल, रेल्वे, इन्कम टॅक्स, एक्साईज, एल. आय. सी. आदी ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ८४११९४४२४१ वर संपर्क करावा, असे आवाहन दिशा अकादमीचे संचालक अजित पाटील यांनी केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: आंदोलनादरम्यान कोणतीही 'नारेबाजी' चालणार नाही! दिल्ली आंदोलनात केवळ 'या' चार घोषणा देण्याचं 'सीजेपी'कडून आवाहन

जंतर मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'; देशभरातून पिझ्झा, बर्गरसह जेवणाची ऑर्डर

Live Updates Marathi : पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi : ३ सामने खेळवून बाकावर बसवले, गंभीरच्या निर्णयावर प्रथमच व्यक्त झाला वैभव... म्हणाला, प्रशिक्षक मला..

Temghar Dam: टेमघर धरण ५० टक्के भरले; पुणेकरांसाठी महिनाभराच्या पाण्याचा दिलासा

SCROLL FOR NEXT