Wasim Akarm  esakal
क्रीडा

Wasim Akarm : पत्नीला हॉट म्हणणाऱ्या चाहत्यावर वसिम अक्रम जाम भडकला; म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Wasim Akarm Wife : पाकिस्तानचा दिग्गज माजी कर्णधार वसिम अक्रम सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतो. चाहत्यांसोबत इंटरॅक्ट करण्यात देखील वसिम अग्रेसर असतो. याचबरोबर आपलं म्हणणं स्पष्टपणे सुनावण्यात देखील वसिम अक्रम मागे पुढे पाहत नाही.

वसिम अक्रमने नुकतेच सोशल मीडियावर एका चाहत्यावर चांगलाच भडकला. वसिम अक्रमने पत्नीसोबत आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोखाली एका चाहत्याने असभ्य कमेंट केली होती. त्यानंतर अक्रम जाम भडकला. त्याने चाहत्याला चांगलंच फैलावर घेतलं.

वसिम अक्रमने ऑस्ट्रेलियन वंशाच्या शनायरासोबत लग्न केलं आहे. शनायरा ही वसिम अक्रमची दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नीचं निधन झाल्यावर वसिमने दुसरे लग्न केलं.

वसिमने शनायरासोबतचा एक फोटो काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला होता. त्याला कॅप्शन दिलं होतं की हे वर्ष चांगलं असेल अशी आशा आहे. अक्रमने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांवर कमेंट करताना एका चाहत्याने वसिम अक्रमच्या पत्नीला हॉटवाईफ असं संबोधलं.

यावर अक्रमने त्वरित प्रतिक्रिया दिली. भडकलेला अक्रम म्हणाला की, 'असं म्हणणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? मला तुमच्या आई वडिलांना भेटायचे आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्ही कशा प्रकारची कृत्य करत आहात.' वसिम अक्रम सोशल मीडियावरून चाहत्यांना अनेकदा उपदेश देत असतो.

वसिम अक्रम नुकतेच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दौऱ्यावर समालोचन करताना दिसला. वसिम अक्रम हा इंग्रजी बोलता येणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. असे क्रिकेटपटू पाकिस्तानात फार कमी आहेत. त्यामुळे अक्रम वर्षभर समालोचन करण्यात व्यग्र असतो.

अक्रम हा पाकिस्तान क्रिकेटबद्दल आपलं स्पष्ट म्हणणं सतात्यानं मांडत अशतो. यामुळे तो कायम चर्चेत देखील असतो. नुकतेच त्याने बाबर आझमच्या फलंदाजीबाबत आणि तिसरी कसोटी न खेळणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीबाबत टीका केली होती. पाकिस्तान ऑस्ट्रेलियामध्ये सलग 17 वा कसोटी सामना हरला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT