Ind Vs Afg T20 : अफगाणिस्तानला मोठा धक्का! रशीद खान दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर

India Vs Afghanistan T20I Series Rashid Khan News |
India Vs Afghanistan T20I Series Rashid Khan News
India Vs Afghanistan T20I Series Rashid Khan News

IND Vs AFG T20I Series Rashid Khan : भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू रशीद खान मालिकेतून बाहेर आहे. रशीद पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. टी-20 क्रिकेटमधील जगातील सर्वात कातील गोलंदाजांपैकी एक असलेल्या राशिदचा अफगाणिस्तानकडून न खेळणे हा संघासाठी मोठा धक्का आहे.

India Vs Afghanistan T20I Series Rashid Khan News
क्रीडा विश्व हादरलं! क्षेत्ररक्षण करताना मुंबईत क्रिकेटपटूचा मृत्यू; एकाच वेळी सुरू होते दोन सामने

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खान भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने जेव्हा संघाची निवड केली तेव्हा त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यावर सस्पेंस सांगितला होता.

एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 नंतर रशीदच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. दुखापतीमुळे तो अॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळला नाही. याशिवाय तो यूएईविरुद्धच्या सामन्यातही राष्ट्रीय संघाचा भाग बनला नव्हता. आता त्याच्या बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे.

India Vs Afghanistan T20I Series Rashid Khan News
Ishan Kishan : इशान किशनचे करिअर धोक्यात... BCCI शी खोटे बोलून दुबईत पार्टी करणं भोवलं?

राशिद हा अफगाणिस्तानचा नियमित कर्णधार आहे. मात्र भारताविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्या जागी इब्राहिम झद्रानकडे कर्णधारपद मिळाले आहे. युएईविरुद्धही झाद्रान कर्णधार होता. राशिद अफगाणिस्तानच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने अफगाणिस्तानसाठी 82 टी-20 सामन्यांमध्ये 130 विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये 2 विकेट्सचा समावेश आहे. त्याने 103 एकदिवसीय सामन्यांमध्ये 183 विकेट घेतल्या आहेत.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना 11 जानेवारीला मोहाली येथे होणार आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी भारताने चार जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय संघात परतले आहेत. या दोन्ही खेळाडूंना 14 महिन्यांनंतर टी-20 संघात खेळण्याची संधी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com