WPL 2023 Champions 
क्रीडा

WPL 2023 Champions: मुंबईच्या पोरींनी मैदान मारताच रोहित सुर्याचा जल्लोष; Video Viral

सकाळ डिजिटल टीम

हरमनप्रीत कौर आणि तिच्या मुंबई इंडियन्सने इतिहास रचला आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई महिला प्रीमियर लीग (WPL 2023) ची पहिली चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या छोट्या धावसंख्येसह मुंबईने रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव केला. पोरींनी मैदान मारताच रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव यांनी जल्लोष साजरा केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (wpl 2023 rohit sharma ishan kishan suryakumar yadav joy after mumbai indians victory in final )

महिला प्रीमियर लीग 2023 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव केला. WPL चा हा अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. मुंबई आणि दिल्ली यांच्यात खेळला जाणारा हा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा पुरुष संघानेही महिलांचा अंतिम सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती.

डब्ल्यूपीएलचा हा फाईल सामना पाहण्यासाठी पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन मैदानात आले होते.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 षटकांत नऊ गडी गमावून 131 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेट स्कायव्हर ब्रंटच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई संघाने अखेरच्या षटकात विजयाचे लक्ष्य गाठले. मुंबईने 19.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा करून सामना जिंकला.

सामना जिंकताच रोहित शर्मा सह अन्य उपस्थित खेळाडू जागेवर उभे राहत टाळ्या वाजवत विजयाचा जल्लोष साजरा केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाच वेळी चषकावर आपले नाव कोरले आहे. तर आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिलांनी मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT