Ravi Shastri Sourav Ganguly WTC Final 2023 esakal
क्रीडा

Ravi Shastri Sourav Ganguly WTC : मस्त चाललंय आमंच! गांगुली - शास्त्रींनी विराटला दाखवून दिली व्यावसायिकता?

अनिरुद्ध संकपाळ

Ravi Shastri Sourav Ganguly WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनलचा सामना हा ओव्हलवर आजपासून सुरू झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या एका तासात चांगला मारा करत कांगारूंच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्सवर तर लाईव्ह स्ट्रिमिंग हे डिस्ने हॉटस्टारवरून होत आहे.

डिस्ने हाटस्टारवर सामना सुरू झाल्यानंतर एक अजब प्राकार पहायला मिळाला. कधी काळी एकमेकांवर खोचक टीका करणारे, विराट कोहलीवरून एकमेकांना टोमणे मारणारे भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज आज एकाच कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून समालोचन करत होते. सामना सुरू असताना एकमेकांची मतं विचारत होते. हे दोन दिग्गज म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली होते. दोघेही व्यावसायिक असल्याने त्यांच्या समालोचनातून या दोघांमध्ये मतभेद आहे हे जाणवतच नव्हते. ही एक विराट कोहली आणि सध्याच्या अनेक क्रिकेटपटूंना एक मोठी शिकवण आहे.

सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यातील नातं हे सर्वांना माहिती आहे. गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या यूट्यूब चॅनलवर दोघांनाही मुलाखत दिली होती. त्यावेळी रवी शास्त्रींनी सौरव गांगुली कसा सामन्यावेळी उशिरा आला होता आणि ते दादाला कसं सोडून आले हे सांगितले. यानंतर गांगुलीला देखील हाच प्रश्न विचारण्यात आला.

त्यावेळी गांगुलीने असं काही घडलं नव्हतं शास्त्रींची मुलाखत कधी घेतली होती असा प्रश्न विचारात चिमटा काढला होता. मात्र व्यावसायिक पातळीवर गांगुली आणि शास्त्री यांनी कसं वागायचं याचं उदाहरणच आज कॉमेंट्री बॉक्समधून दिले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

Latest Marathi News Live Update : सीबीआय संचालक निवडीसाठीच्या बैठकीनंतर राहुल गांधी पंतप्रधान निवासस्थानातून रवाना

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

SCROLL FOR NEXT