Ind vs Aus WTC Final : टीम इंडियासोबत कांगारूने लावल्या काळ्या फिती, ओडीसा ट्रेन अपघातावरून ओव्हल स्टेडियम भावुक | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही बांधल्या काळ्या फिती
India and Australia Players Wear Black Armbands To Pay Respect To Victims Of Odisha Train Accident ind vs aus WTC Final 2023 cricket news in marathi kgm00

Ind vs Aus WTC Final : टीम इंडियासोबत कांगारूने लावल्या काळ्या फिती, ओडीसा ट्रेन अपघातावरून ओव्हल स्टेडियम भावुक

India and Australia Players Wear Black Armbands : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूच्या जोडीने मैदानात उतरला आहे.

दरम्यान, ओडिशातील दुःखद रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या लोकांना आदरांजली वाहण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी काळ्या हातपट्ट्या बांधल्या आहेत. भारताच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघातांपैकी एकामध्ये तीन ट्रेनची टक्कर झाल्यामुळे जवळपास 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान, महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अश्विनसोबत शर्मानेही इशान किशनला वगळले आणि स्पेशालिस्ट कीपर केएस भरतसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

अजिंक्य रहाणेचे कसोटी संघात पुनरागमनही संघाने केले. अश्विन खेळत नसल्यामुळे, भारताकडे फक्त रवींद्र जडेजा हा फिरकीपटू आहे, परंतु ढगाळ वातावरण पाहता वेगवान गोलंदाजांना मुख्य भूमिका बजावावी लागेल.

दोन्ही संघाची Playing-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड.