WTC Point Table  esakal
क्रीडा

WTC Point Table : दक्षिण आफ्रिकेने एकाच फाईटमध्ये वातावरण केलं टाईट, भारताची झाली मोठी घसरण

अनिरुद्ध संकपाळ

WTC Point Table : आयसीसी वर्ल्डकप टेस्ट चॅम्पियनशिप 2023 - 25 ची सुरूवात झाली असून हे त्याचे तिसरे सत्र आहे. पहिल्या सत्रात न्यूझीलंड आणि दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलिया विजेते झाले होते. या दोन्ही फायनलमध्ये दुसरा संघ हा भारताचा होता. अॅशेस 2023 ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपची सुरूवात झाली होती.

भारतीय संघाने यंदाच्या WTC स्पर्धेतील पहिली मालिका 1 - 0 ने जिंकली. तर पाकिस्तानने श्रीलंकेला 2 - 0 ने पराभूत केलं. भारताने दुसऱ्या मालिकेतील पहिला सामना गमवला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभूत केलं. यामुळे ते WTC पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहचला आहे.

आफ्रिकेने आतापर्यंत एक सामना खेळला आहे. त्या तविजय मिळवत त्यांनी 12 गुण घेतले आहेत. मात्र त्यांचे विनिंग पर्सेंटेज हे शंभर टक्के असल्याने ते अव्वल स्थानावर पोहचले आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे त्यांनी 3 सामन्यातील 2 सामने जिंकले असून एका सामन्यात पराभव झाला आहे. ते 22 गुण आणि 61.11 विनिंग पर्सेंटेजनुसार दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. न्यूझीलंडने 2 पैकी एक सामना जिंकला असून एक गमावला आहे. ते 12 गुण आणि 50 टक्के विनिंग पर्सेंटेज घेत तिसऱ्या स्थनावर आहेत.

बांगालेदश देखील 12 गुण आणि 50 टक्के विनिंग पर्सेंटेज घेत चौथ्या स्थनावर आहेत. तर भारतीय संघाने आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना मोठ्या फरकाने हरल्याने पाचव्या स्थानावर पोहचले आहेत. भारताने 3 सामन्यापैकी 1 सामना जिंकला असून एक सामना गमावला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. भारताचे 16 गुणांसह विनिंग पर्सेंटेज हे 44.44 टक्के इतके झाले आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Cooperative Bank Profit: सामाजिक बांधिलकीसह आर्थिक बळकटी; राज्य सहकारी बँकेचा नफा ७०२ कोटींवर, सहकार क्षेत्रासाठी नवा आदर्श

Mumbai News: अफवांना पूर्णविराम! नव्या घरांचे स्वप्न आता हक्कासह पूर्ण होणार; धारावी प्रकल्पात मोठा ट्विस्ट

Pune Cyber Fraud: सायबर गुन्हेगारांचे पुणेकरांवर हल्ले तीव्र; शेअर ट्रेडिंग, मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्म व आयपीओ आमिषातून ९२ लाखांची लूट

Latest Marathi News Live Update: सोनं चोरीप्रकरणी तिघांना अटक

२ महिन्यात तुटलेलं मनोज बाजपेयी यांचं पहिलं लग्न; 'या' कारणामुळे पळून गेलेली पहिली पत्नी, नंतर मुस्लिम अभिनेत्रीने धरला हात

SCROLL FOR NEXT