Yuvraj Singh  esakal
क्रीडा

Yuvraj Singh : आशिष नेहराला माझ्यासाठी गुजरात टायटन्समध्ये जॉब पाहण्यास सांगितलं मात्र त्यानं...

अनिरुद्ध संकपाळ

Yuvraj Singh : भारताचा वर्ल्डकप हिरो आणि माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आज एक खळबळजनक दावा केला आहे. गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराला गुजरात टायटन्समध्ये जॉब पाहण्यास सांगितलं होतं मात्र त्यानं नकार दिला असा दावा युवराज सिंगने केला आहे. युवराज सिंगने आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने 132 आयपीएल सामन्यात 2750 धावा केल्या असून त्याने 83 धावांची सर्वोत्तम खेळी देखील केली आहे.

युवराज सिंग पीटीआयशी बोलताना म्हणाला की, 'मला आयपीएलमध्ये कोणती संधी मिळते हे पहावं लागले. मात्र सध्या तरी माझी मुलं माझी प्राथमिकता आहे. ते एकदा का शाळेत जायला लागली की माझ्याकडे जास्त वेळ असेल. त्यानंतर मी प्रशिक्षक होण्याचा विचार करेन. मला तरूण खेळाडूंसोबत काम करण्यास आवडेल. विशेष करून माझ्या राज्याच्या खेळाडूंसोबत काम करण्यात आवडले. त्यांना मार्गदर्शन करणे मी पसंत करेन. आयपीएल संघाचा भाग होणंही मला आवडेल.

युवराज पुढे म्हणाला की, 'मी आशिष नेहराला गुजरात टायटन्समध्ये जॉब आहे का असं विचारलं होतं. मात्र त्यानं नकार दिला. आता पहावं लागेल की दुसरीकडे मला जागा मिळते का. सध्याच्या घडीला मला कुटूंब आणि काम याचा समतोल साधावा लागणार आहे. येत्या काही वर्षात नक्कीच मी क्रिकेटसाठी काहीतरी करेन. मी तरूण खेळाडूंना मार्गदर्शन करू शकतो. मी चांगलं योगदान देऊ शकतो.'

युवराज सिंगने भारतीय संघाला भविष्यात येणाऱ्या आव्हानांसाठी मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय संघाने 2013 पासून आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख! पंढरपूर तालुक्यातील ‘या’ ७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कर्जमुक्तीचे सातबारा, पंढरपूर बाजार समितीत कृषी महोत्सव

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT