NZ vs PAK VIDEO : खामोश... पाकिस्तानी क्रिकेटपटू त्याच्याच चाहत्यावर जाम भडकला

NZ vs PAK VIDEO
NZ vs PAK VIDEOesakal

NZ vs PAK VIDEO : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सध्या टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी 20 सामना आज हॅमिल्टन येथे खेळवण्यात आला. यावेळी पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू इफ्तिकार अहमद आणि त्याचा चाहता यांच्यात मैदानावरच शाब्दिक वादावादी झाली. इफ्तिकारने या चाहत्याला शांत बसण्यास सांगितले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

NZ vs PAK VIDEO
KL Rahul : केएल राहुलकडून काढून घेतली 'ही' जबाबदारी; एका कसोटी मालिकेनंतर लगेचच...

दुसऱ्या सामन्यादरम्यान, इफ्तिकार अहमद हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी पाकिस्तानचा एक चाहता त्याला चाचू - चाचू म्हणत डिवचत होता. इफ्तिकारला हे आवडलं नाही त्याने त्या चाहत्याला शांत बसण्यास सांगितलं त्यावेळी चाहत्याने आम्ही तुझे चाहते आहोत असं सांगितलं.

NZ vs PAK VIDEO
Ind Vs Afg 2nd T20 Live Score : टीम इंडियात होणार बदल; किती वाजता सुरू होणार सामन्याचा थरार? जाणून घ्या

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडने दुसऱ्या टी 20 सामन्यात 20 षटकात 194 धावा केल्या. त्यात सलामीवीर फिन एलनने 74 धावांची दमदार खेळी केली. याच्या प्रत्युत्ततरा पाकिस्तानचा संपूर्ण संघ 19.3 षटकात 173 धावात बाद झाला. पाकिस्तानने सामना 21 धावांनी गमावला.

पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू बाबर आझमने 66 धावांची धडाकेबाज खेली केली. तर फखर जमानने 50 धावांची खेळी करत त्याला साथ दिली. मात्र पाकिस्तानच्या पदरात पराभवच पडला.

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातील दोन सामन्यात पाकिस्तानच्या पदरी परभावच आला आहे. त्यामुळे त्यांना मालिका वाचवण्यासाठी तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे. मालिकेतील तिसरा सामना हा 17 जानेवारीला ड्युनेडीन येथे खेळवला जाणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com