Yuzvendra Chahal Shikhar Dhawan Have fun with NCA Female Worker
Yuzvendra Chahal Shikhar Dhawan Have fun with NCA Female Worker  esakal
क्रीडा

VIDEO: धवन - चहलची NCAच्या महिला कर्मचाऱ्याबरोबर आयटम साँगवर दंगामस्ती

सकाळ डिजिटल टीम

शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हे भारतीय संघातील सर्वात दंगेखोर आणि चेष्टा मस्करी करण्यात पटाईत असलेले खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांची मैदानावरची तसेच मैदानाबाहेरची देखील 'कामगिरी' कायम चर्चेत असते. शिखर धवन आणि युझवेंद्र चहल हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. या दोघांचेही व्हिडिओ आणि रिल्स व्हायरल होत असतात. सध्या त्यांचा राष्ट्रीय क्रिकेट अॅकेडमीमधील (NCA) महिला कर्मचाऱ्याबरोबरचा (Female Worker) व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे.

शिखर धवन आणि युझवेंद्र चहल हे दोघेही सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा (Indian Cricket Team) एक भाग आहेत. सध्या हे दोघेही एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहेत. याचदरम्यान शिखर धवन आणि युझवेंद्र चहलने एनसीएमधील एका महिला कर्मचाऱ्याबरोबर दंगामस्ती केली. या दोघांनी फिटनेस सेशननंतर 'बाबूजी जरा धिरे चलो बिजली खडी यंहा बिजली खडी' या आयटम साँगवर एक व्हिडिओ तयार केला. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

शिखर धवन आणि युझवेंद्र चहलने भारताच्या वनडे आणि टी 20 संघात नुकतेच पुनरागमन केले आहे. चहलने वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत आपली चमक दाखवली. तर वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेनंतर शिखर धवनला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या भारताचा कसोटी संघ 12 मार्चपासून बंगळुरूमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT