Shivam Dube Vs Hardik Pandya esakal
क्रीडा

Shivam Dube Vs Hardik Pandya : टी 20 वर्ल्डकप संघात शिवम की हार्दिक... जहीर खानने वर्तवला धक्कादायक अंदाज

अनिरुद्ध संकपाळ

Shivam Dube Vs Hardik Pandya : भारताने नुकतेच अफगाणिस्तानविरूद्धची तीन टी 20 सामन्यांची मालिका 3 - 0 अशी खिशात घातली. या मालिकेत हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट म्हणून संघात आलेल्या शिवम दुबेने जबरदस्त कामगिरी करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. शिवम दुबेने गोलंदाजीत देखील चमक दाखवत कर्णधाराला निराश केलं नाही.

या कामगिरीनंतर वेस्ट इंडीज आणि युएसएमध्ये जून महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्यापैकी कोणाची निवड होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवम दुबेने संघातील जागेसाठी प्रबळ दावेदारी ठोकत हार्दिकचे टेन्शन वाढवले.

दरम्यान, भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानने एक आश्चर्यकारक अंदाज वर्तवला आहे. जहीरने कलर सिनेप्लेक्सशी बोलताना सांगितले की, 'ते नक्कीच दोघांनाही घेऊ शकतात. जर तुम्ही त्या प्रकारे प्लॅन केला तर हे नक्कीच होऊ शकतं. मात्र हे सर्व तुम्ही सहावा गोलंदाजीचा ऑप्शन विचारात घेणार असाल तर होऊ शकतं.'

जहीर खानच्या मते भारतीय संघ शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या या दोघांनाही संघात सामावून घेऊ शकतं. तो म्हणाला की 'जर तुम्ही सहावा गोलंदाजीचा पर्याय हवा असं म्हणता त्यावेळी तुम्हाला बॅकअप देखील गरजेचा आहे. जर तुम्ही संघाबाबत बोलत आहात तर ज्यावेळी तुम्ही दोन ऐवजी एकच विकेटकिपर घेऊन जाल त्यावेळी तुम्ही हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोघांनाही संघात पाहू शकता.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT