Beauty Tips  esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : चेहरा गोरापान अन् काळी कुळकुळीत मान, हे घरगुती उपाय करा,नक्की फरक पडेल

मुलतानी माती आणि ऍलोवेरा जेलचा पॅक कसा बनवावा?

Pooja Karande-Kadam

Beauty Tips :

सध्या लग्नाचा, समारंभांचा सिझन सुरू आहे.  त्यामुळे मेकअप अन् फेशिअल ट्रिटमेंट केली जाते. पण, मानेच्या काळवंडलेपणाकडे फारसे कोणाचे लक्ष नसते. पण, बॅक ओपन असलेले डिझाईन्सचे ड्रेस अन् ब्लाऊज घालणे नकोसे वाटते. कारण, काळी पडलेली मानेकडे लोकांचे जास्त लक्ष जाते.

चेहऱ्याच्या त्वचेसोबतच शरीराच्या इतर भागांचीही काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तीव्र सूर्यप्रकाशामुळे आपली त्वचा काळी पडते. यासाठी आपण घरगुती वस्तूंपासून बनवलेले स्क्रब वापरू शकतो. मानेवरील टॅनिंग वेळोवेळी साफ करणे खूप महत्वाचे आहे.

चला तर मग जाणून घेऊया घरगुती वस्तूंच्या मदतीने काळी झालेली मान कशी स्वच्छ करावी आणि या घरगुती वस्तूंचे फायदे जाणून घेऊया.

मान स्वच्छ करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा?

मुलतानी माती

मुलतानी माती मानेवर लावल्याने फायदा होतो. मुलतानी मातीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक  त्वचेची टॅनिंग  दूर करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले घटक त्वचेवरील डाग आणि पिंपल्सचे डाग कमी करण्यास मदत करतात. मुलतानी माती त्वचेला खोलवर स्वच्छ करण्याचे काम करते.

ऍलोवेरा जेल

ऍलोवेरा जेल मानेवर लावल्याने फायदा होतो. ऍलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-बी असते जे त्वचेला मुबलक प्रमाणात पोषण देते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करतात. एलोवेरा जेलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेला सर्व प्रकारच्या त्वचेच्या संसर्गापासून वाचवतात.

काळी झालेली मान साफ ​​करण्यासाठी काय करावे?

काळ्या मानेसाठी बनवला जाणारा हा पॅक एलोवेला अन् मुलतानी मातीपासून बनवणार आहोत.त्यासाठी साधारण २ ते ३ चमचे मुलतानी माती घ्या. त्याच समप्रमाणात कोरफडाचे जेलही घ्या.हे दोन्ही चांगले मिसळा.

बोटांच्या मदतीने मानेवर स्क्रब लावा. 10 मिनिटे हलक्या हाताने स्क्रब करा. किमान 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर, कापसाच्या मदतीने मान पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा.

हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून 4 वेळा वापरू शकता. याचा सतत वापर केल्याने काही दिवसातच तुमची मान साफ ​​दिसू लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT