Beauty Tips : Latte Coffee तर प्यायलेच असाल, पण Latte Makeup केलाय का? जाणून घ्या टिप्स

न्यूड ते बोल्ड आय मेकअपपर्यंत तुम्ही अनेक मेकअप ट्रेंड्सबद्दल ऐकले असेल, पण आज आपण Latte Makeup बद्दलची माहिती आहे.
Latte Makeup Tips
Latte Makeup TipsSakal

कित्येकांच्या दिवसाची सुरुवात जशी चहा पिऊन होते, तसेच काही लोकांना मात्र कॉफी हे पेय अधिक प्रिय असते. आजवर आपण अनेकदा Latte Coffee प्यायली असावी. ही कॉफी प्यायल्याने मूड अगदी फ्रेश होतो. पण आपण कधी Latte Makeup बद्दल ऐकले आहे का? 

हो, तुम्ही अगदी बरोबरच वाचले आहे. हा मेकअप Latte Coffeeपासूनच प्रेरित आहे व सध्या ट्रेंडमध्येही आहे. हॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत सर्वांमध्ये Latte Makeupची क्रेझ पाहायला मिळते. ट्रेंडमध्ये असणारा हा मेकअप करण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घेऊया सविस्तर माहिती… 

Latte Makeup Tips
Celebrity Hair Care Tips : अभिनेत्री भाग्यश्री केसांसाठी या 2 तेलांचा करते वापर, जाणून घ्या तेलाचं नाव-फायदे

Latte Makeup म्हणजे नेमके काय? 

Latte Makeupची सुरुवात टिकटॉक स्टार रचेल रिग्लरने (Rachel Rigler Latte Makeup) केली होती. या मेकअप प्रकारात कॉफीप्रमाणेच चॉकलेटी आणि बोल्ड रंगांचा वापर केला जातो. हा लुक बहुतांशी न्यूड मेकअपप्रमाणेच असतो, पण यामुळे किंचितसा डार्क व बोल्ड लुक मिळतो. यामध्ये फुल कव्हरेज फाउंडेशनसह ब्राऊन आयशॅडोचा वापर केला जातो.   

Latte Makeup Tips
White Hair Remedies : केस काळे करण्यासाठी नारळाच्या तेलात मिक्स करा 'या' बिया, पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर

कसा करावा Latte Makeup?

- Latte Makeup करण्यासाठी सर्वप्रथम आपली त्वचा स्वच्छ करून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी क्लीन्झरचा वापर करून चेहरा स्वच्छ करा आणि नंतर मॉइश्चराइझर, सनस्क्रीन आणि मेकअप प्राइमर लावा.

Latte Makeup Tips
सावधान! घाणेरड्या बेडशीटमुळे होऊ शकतात त्वचेच्या गंभीर समस्या, इतक्या दिवसांनी बदलावं अंथरूण

- प्राइमर लावल्यानंतर लाइट वेट फुल कव्हरेज फाउंडेशनसाठी घ्यावे, ज्याचे शेड तुमच्या स्किन टोनपेक्षा एक शेड लाइट टोन असावे. जर चेहऱ्यावर काळे डाग असतील किंवा डार्क सर्कलची समस्या असेल तर कंसीलर देखील लावावे आणि योग्य पद्धतीने ब्लेंड करावे. 

- Latte Makeupमध्ये डोळे, गाल आणि ओठांवर हलक्या तपकिरी रंगापासून ते गडद तपकिरी रंगाचा मेकअप केला जातो. आपण आपल्या स्किन टोननुसार तपकिरी रंगाच्या मेकअपची निवड करू शकता.  

- आयशॅडोसाठी ब्राउन किंवा बेज कलरचा वापर केला जातो. यामुळे तुम्हाला खूपच बोल्ड आणि स्टायलिश लुक मिळेल.  


- Latte Makeup करताना आपण आयलाइनर देखील काळ्याऐवजी डार्क ब्राउन कलरचा वापर करावा. याव्यतिरिक्त मस्कारा किंवा आयलॅशेसचाही आपण वापर करू शकता. 

- जर आपला चेहरा जाड दिसत असेल तर डार्क ब्राउन कॉन्टोरचा वापर करून आपला चेहऱ्याला एकदम शार्प लुक द्यावा. एक चांगलेस ब्लश चीक बोन्सवर लावा आणि हायलाइटरनं फिनिश लुक द्यावा.  

- Latte Makeupमध्ये ओठांवर खूप चांगल्या पद्धतीने डिटेलिंग केली जाऊ शकते. यासाठी आपण सर्वप्रथम डार्क ब्राउन लिप लाइनर लावा आणि यानंतर लाइट ब्राउन लिपस्टिक किंवा न्यूड शेड लिपस्टिक लावावी. 

- मेकअप पूर्ण झाल्यानंतर मेकअप फिक्सरची मदत घेऊन आपल्या चेहऱ्यावर स्प्रे करावे. काही सेकंद चेहरा कोरडा होऊ द्यावा आणि फायनली तुम्हाला मिळाला आहे Latte Makeup लुक. आपण हा लुक डे किंवा नाइट पार्टीसाठीही आजमावून पाहू शकता. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com