dipti devi
dipti devi sakal
लाइफस्टाइल

जगणं सुरेल करणारी संगीतमैत्री

सकाळ वृत्तसेवा

- दीप्ती देवी

मला शास्त्रीय, उपशास्त्रीय, वाद्यसंगीत ऐकायला खूप आवडतं. मला असं वाटतं की, संगीतामध्ये हिलींग पॉवर आहे. संगीतामध्ये आपला मूड तत्काळ चांगला करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मला संगीत ऐकण्यानं भावनिक आणि मानसिकदृष्ट्याही फार मदत होते. संगीत ऐकणं हा माझा छंद नसून ती माझी सवय आहे.

तो माझ्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे, असं म्हणता येईल. जेव्हा जेव्हा मला निवांत वेळ मिळेल, किंवा मला वेळ जरी मिळाला नाही, तरी मी ही गोष्ट कटाक्षाने पाळते की मी चांगलं संगीत ऐकीन. त्यात गाणीसुद्धा येतात; पण विशेषतः शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, ठुमरी मला ऐकायला आवडतं.

माझ्या घरात तसं कोणी गात नाही; पण माझ्या घरी अगदी फार पूर्वीपासून मी आकाशवाणी ऐकते. त्यामुळे ते ऐकून ऐकून मला गाण्याची आवड लागली. मी शास्त्रीय गायनाचं शिक्षणही घेतलेलं आहे. मी ‘मध्यमा’पर्यंत शिक्षण घेतलं आहे; पण तिथून पुढे मला फार शिकता आलं नाही आणि मी गातही नाही. त्यावेळी मला शास्त्रीय संगीत की नाटक अशी निवड करायची होती.

त्यावेळी मी नाटक, अभिनय क्षेत्राची निवड केली आणि त्यामुळे संगीत मागं राहिलं; पण आतून कुठूनतरी या आवडीकडे मी ओढली जात होते. माझे मित्र-मैत्रिणीही असेच आहेत, ज्यांना शास्त्रीय संगीतात रस आहे. आम्ही भेटलो, तर याच विषयावर बोलत असतो. मी शास्त्रीय संगीताच्या बऱ्याच कार्यक्रमांनाही आवर्जून जाते. आयुष्यातल्या अनेक चढ-उतारांमध्ये मला संगीतानं साथ दिलेली आहे. जेव्हा तुमचे कोणी खास मित्र- मैत्रिणी नसतात, तेव्हा संगीताशी तुमची मैत्री होते, असं मला वाटतं,

मला पहिल्यापासूनच संगीताच्या ताकदीची जाणीव आहे. मी लहान असताना खूप मोठ्या निर्माते, दिग्दर्शक असलेल्या एका व्यक्तीच्या घरी गेले होते. तेव्हा तिथे शफाकत अली खान आले होते, त्यांची गायनाची बैठक होती. त्यांच्या गाण्याला मी जी दाद देत होते, ती ऐकून त्यांनी मला सांगितलं होतं की, ‘आप संगीत बहोत अच्छा सुनती है’ ही मला मिळालेली खूप मोठी शाबासकी होती.

एवढ्या सगळ्या लोकांमध्ये त्यांचं माझ्याकडे लक्ष जाणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आयुष्यात कधी ना कधी आपण डिप्रेस्ड असतो, आपलं मन कशातच लागत नाही, मन उदास असतं, तेव्हा मला संगीतानं खूप मदत केली आहे. मी त्या काळात रात्रंदिवस संगीत ऐकायचे आणि माझ्यासमोरच्या आव्हानांसाठी स्वतःला तयार करायचे. त्यामुळे संगीत हा माझा सर्वांत जवळचा मित्र आहे.

मी फारसं चांगलं गाऊ शकतं नाही; पण मी उत्तम ऐकू शकते. मला कोणत्याही गोष्टीचं प्रदर्शन मांडायचं नसतं, त्यामुळे मी माझे छंद फारसे कुठे बाहेर सांगत नाही. मी प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी करते. त्यामुळे मला वाटेल, की मी आयुष्यात थोडीफार स्थिरस्थावर होत आहे, तेव्हा मी पुन्हा एकदा शून्यापासून शिकायला सुरूवात करेन. मला बासरीसुद्धा शिकायची आहे; पण सध्या नाही. जेव्हा मला वाटेल की मी आता त्या शिक्षणासाठी पुरेसा वेळ काढू शकेन, तेव्हाच मी शिकणार आहे.

आपल्याला पोटापाण्यासाठी काहीतरी व्यवसाय करावाच लागतो; पण छंद तुम्हाला आणखी चांगलं जगायला मदत करतो. या यांत्रिक जगात छंद आपल्याला जिवंत ठेवतात, माणूस म्हणून जगायला मदत करतात. त्यामुळे छंद हा आपल्या सवयीचा भाग आपण करायला हवा. आपलं व्यावसायिक आयुष्य आणि छंद यांचा समतोल साधला पाहिजे. तुम्ही रोजच्या आयुष्यात श्वास घेत असता; पण तुम्ही छंद जोपासता, तेव्हा हा श्वास तुम्ही अनुभवता, तुम्हाला फ्रेश वाटतं. छंदांमुळे आपल्याला प्रत्येक बाजूनं सकारात्मक दृष्टिकोन मिळतो.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT