Diwali Crackers  Sakal
लाइफस्टाइल

Diwali Car Care Tips : फटाके फोडताना तुमच्या कारची अशी घ्या काळजी

जर तुमच्याकडे सीएनजी कार असेल तर, तुम्हाला इतर कारच्या तुलनेत अधिकची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

Diwali Car Care Tips : दिवाळी हा आनंदाचा आणि समृद्धीचा सण असला तरी फटाक्यांची एक ठिणगी मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते. त्यात पार्किगच्या समस्येमुळे अनेकांच्या कार मोकळ्या जागेतच उभ्या करतात. आज आम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर कोणते कशाप्रकारे फटाक्यांपासून कारचे रक्षण करता येईल या विषयी माहिती सांगणार आहोत.

वाहन कव्हर करून ठेवू नका

दिवाळीच्या दिवशी तुमची गाडी कधीही कव्हर किंवा इतर कोणत्याही वस्तूने झाकून ठेवू नका. कारण गाडीचे कव्हर त्वरीत आग लागेल अशा मटेरियलपासून बनलेले असते. कव्हरमुळे आग लागण्याचा धोका वाढतो. यामुळे लाखो रुपयांची कार क्षणार्धात जळून राख होऊ शकते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी एखाद्या बंद ठिकाणी कार पार्क करावी आणि हे शक्य नसल्यास मोकळ्या जागेत पार्क करताना कव्हर वापरू नये.

सीएनजी कारची घ्या विशेष काळजी

जर तुमच्याकडे सीएनजी कार असेल तर, तुम्हाला इतर कारच्या तुलनेत अधिकची खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीला जास्त वेगाने आग लागते. कारमध्ये बसवलेल्या सीएनजी टँकमुळे मोठा स्फोट होण्याबरोबरच आग लागू शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे सीएनजी कार असेल तर, शक्यतो जेथे फटाके फोडले जाणार नाहीत अशा ठिकाणी कार पार्क करा. हीच खबरदारी दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठीही घ्यावी.

गाडीवर दिवा लावू नका

दिवाळीच्या दिवशी लोक वाहनांचीदेखील पूजा करतात. पूजा करताना घाईगडबडीत अनेकांकडून दिवा ठेवला जातो. असे केल्याने चुकीने दिवा पडल्यास गाडीला आग लागण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गाडीची पूजा करताना दिवा ठेवणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

UP Farm Scheme: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! यूपीमध्ये कृषी यंत्रांवरील अनुदानासाठी आजपासून ऑनलाइन बुकिंग सुरू

IND VS ENG 2ND ODI: विराट कोहलीचा विश्वविक्रम! मोडला श्रीलंकेच्या महान फलंदाजाचा विक्रम; सचिन, धोनी यांनाही सोडले मागे

Shivalay Park: अवघ्या ५० रुपयांत करा भारताच्या नकाशावर '१२ ज्योतिर्लिंगांसह' प्रमुख शिवदर्शन! प्रयागराजमध्ये साकारला भव्य 'शिवालय पार्क'

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

SCROLL FOR NEXT