Diwali Safety Tips फटाके फोडताना हाताला भाजलंय? त्वरित करा हे घरगुती उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firecrackers

दिवाळीच्या दिवशी फटाके फोडताना खबरदारी घेणे मुलं किंवा प्रौढ व्यक्ती विसरतात आणि अपघाताला बळी पडतात.

फटाके फोडताना हाताला भाजलंय? त्वरित करा हे घरगुती उपाय

दिवाळीत फटाके फोडताना अनेकदा काही ना काही होत असतं. काही वेळा दवाखान्यात जाणेही अवघड होते. कारण दिवाळीच्या दिवशी फटाके फोडताना खबरदारी घेणे मुलं किंवा प्रौढ व्यक्ती विसरतात आणि अपघाताला बळी पडतात. अशा परिस्थितीत, फटाके फोडताना जर एखाद्या व्यक्तीचा हात किंवा पाय भाजला तर त्याला प्रथमिक उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी कोणते उपाय करावेत त्याबद्दल जाणून घ्या.

फटाके फोडताना हे घरगुती उपाय करा...

थंड पाणी -

अनेकदा लोक फटाक्यांमुळे हात किंवा पाय जळत असेल तर त्यावर बर्फ ठेवतात. हे अजिबात करू नका, असे केल्याने रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. कोणत्याही ज्वलनशील पदार्थाने किंवा फटाक्याने हात व पाय जळाल्यास त्यावर ताबडतोब थंड पाणी टाकावे किंवा हात व पाय थंड पाण्यात बुडवावेत. असे केल्याने जखमेच्या भागाला आराम मिळतो.

तुळशी रस-

फटाक्यांमुळे हात भाजले तर त्या ठिकाणी तुळशीचा रस लावता येतो. असे केल्याने जळलेल्या भागावर थंडावा मिळण्याबरोबरच जळजळ कमी होते. याशिवाय जळण्याची खूणही नाहीशी होते.

खोबरेल तेल-

खोबरेल तेल थंड असते. प्रथमिक उपचार म्हणून जळलेल्या जागेवर खोबरेल तेल लावल्यास त्या जागेवर आराम मिळतो.

कापूस वापरु नका -

फटाक्यांमुळे जळलेल्या जागेवर कापूस कधीही लावू नये. यामुळे कापूस जखमेवर चिकटून राहून वेदना आणि जळजळ होऊ शकते. जखम उघडी ठेवा आणि आवश्यक असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

फटाके फोडताना घ्या ही खबरदारी-

- तुम्ही फटाके फोडता त्या ठिकाणी पाण्याची आणि वाळूची बादली ठेवा.

- फटाके फोडताना सिंथेटिक आणि नायलॉनचे कपडे घालू नका.

- फटाके पेटवताना आग लागली तसेच ती वाढत असेल तर त्यावर वाळू टाकून आग विझवा.

- कधीही फटाके लावून हातात धरु नका यामुळे हात भाजू शकते.

टॅग्स :Diwali Festivalbest tips