snake swallowing ak 47 rifle 
लाइफस्टाइल

सापाने गिळली AK 47 रायफल? जाणून घ्या व्हायरल फोटो मागील सत्य

शर्वरी जोशी

अजस्त्र सापाने एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला गिळल्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. पण कधी सापाने बंदूक किंवा AK 47 रायफल गिळल्याचं ऐकलं आहे का? नाही ना? पण सोशल मीडियावर अशाच एका सापाचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सापाच्या पोटात AK 47 रायफल असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे या सापाची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर, काहींनी मात्र सापाची ती अवस्था पाहून दु:ख व्यक्त केलं आहे. मात्र, खरंच या सापाने AK 47 रायफल गिळली आहे का? हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, व्हायरल होत असलेल्या फोटोमागील सत्य काही वेगळंच आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका सापाने 47 रायफल  गिळल्याचं पाहायला मिळत आहे. ही रायफल गिळल्यामुळे त्या सापाला जागचं हलतादेखील येत नसल्यामुळे अनेकांनी त्यावर दु:ख व्यक्त केलं आहे. मात्र, व्हायरल होत असलेल्या या फोटोमागचं सत्य काही औरच असून या सापाने 47 रायफल किंवा अन्य कोणतीही रायफल गिळलेली नाही. 

प्रत्यक्षात या सापाने 47 रायफल गिळली नसून हा सापच मुळात खोटा आहे. रशियातील वसिली स्लोनोव या आर्टिस्टने रबरपासून हा खोटा साप तयार केला आहे. परंतु, वसिली यांनी इतक्या सुंदररित्या हा साप तयार केला आहे. ज्यामुळे या सापाकडे पाहिल्यानंतर तो खरा असल्याचा भास निर्माण होतो. विशेष म्हणजे रबराचा हा साप विक्रीसाठी ठेवण्यात आला असून आर्टसी या पेजवर तो विक्रीसाठी उपलब्ध आहे. या सापाचं नाव ‘AK-Python’ असं ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, वसिली यांनी २०१९ मध्ये हा साप तयार केला असून २१ ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याचे काही फोटो शेअर केले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Lonavala Railway: पुणे विभागाचा मोठा निर्णय! दररोज दोन लाख प्रवाशांना दिलासा; पुणे-लोणावळा मार्गावर मोठे रेल्वे काम सुरू

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

Latest Marathi News Live Update : संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

'मला स्वत:लाच कानाखाली मारावी वाटली' अक्षय कुमारला आलेला स्वत:चाच राग, म्हणाला...'माझेच सिनेमे पाहून...'

Pimpri Chinchwad fire: पिंपरी-चिंचवड हादरले! भंगार गोदामातील भीषण आगीने परिसर धुराने व्यापला, ६० जवानांची शर्थ

SCROLL FOR NEXT